रश्मी शुक्ला आणि फडणवीस यांच्या भेटीवर काँग्रेसचे टीकास्त्र

आयपीएस रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्त असताना २०१५ ते २०१९ या कालावधीत राज्यातील महत्त्वाच्या राजकीय नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅप केल्याचा आरोप आहे.

रश्मी शुक्ला आणि फडणवीस यांच्या भेटीवर काँग्रेसचे टीकास्त्र

आयपीएस रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्त असताना २०१५ ते २०१९ या कालावधीत राज्यातील महत्त्वाच्या राजकीय नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅप केल्याचा आरोप आहे. फोन टॅपिंग प्रकरणात २०२१ पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंगचा संदर्भ देत फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर आरोप केले होते. ता सर्व प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी बुधवारी दि १७ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भाजप नेते मोहित कंबोज हे देखील फडणवीस यांच्या निवासस्थानी भेटीसाठी आले होते.

फोन टॅपिंग प्रकरणी आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर चर्चांना उधाण आलं आहे. फोन टॅपिंग प्रकरणी आज (गुरुवारी) मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भाजप नेते मोहित कंबोज देखिल फडणवीस यांच्या निवासस्थानी भेटीसाठी आले होते. फोन टॅपिंग प्रकरणात ठाकरे सरकारच्या काळात चौकशी सुरु झाली आणि रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. आता सत्तांतर झाल्यानंतर या प्रकरणाचं पुढं काय होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या पार्श्वभूमीवर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे.

फोन टॅपिंग प्रकरणी आरोप असणाऱ्या पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बुधवारी रात्री सागर बंगल्यावर भेट घेतली. रश्मी शुक्ला आणि फडणवीसांच्या या भेटीनंतर अनेक तर्क वितर्कांना उधाण आले आहे. या भेटीवरुन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे. “सागर बंगल्यात वॉशिंग मशीनच काम चालतं असेल”, असा खोचक टोला थोरातांनी फडणवीसांना लगावला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्लांनी फडणवीसांच्या घेतलेल्या भेटीमुळे चर्चांना उधाण आले आहे. तसेच अधिवेशनात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची आज मागणी करणार आहे. सध्या राज्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या मागे उभं राहावं, असं आवाहन काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केलं आहे.

 

हे ही वाचा :-

विधीमंडळाचं पावसाळी अधिवेश ईडी सरकार हाय हाय विरोधकांकडून घोषणाबाजी

पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस, ईडी सरकार हाय हाय विरोधकांकडून घोषणाबाजी

 

Exit mobile version