spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कॉंग्रेसने प्रदेशाध्यक्ष बदला, माजी आमदार आशिष देशमुख यांचं पक्षश्रेष्ठींना पत्र

यात प्रदेशाध्यक्ष म्हणून श्री. नाना पटोले हेच जबाबदार आहेत. पटोलेंच्या कार्यकाळात पक्षाला सातत्याने नाचक्कीचा सामना करावा लागत आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये वाद सुरू आहेत. यावरूनच काँग्रेसमध्ये अनेकजण नाराज देखील आहे आणि त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर आता प्रश्न उपस्थित केले जात आहे. अशातच काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी थेट काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले आहे आणि नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे.

पत्रात काय म्हणाले आशिष देशमुख?

आपल्या नेतृत्वात कॉंग्रेस (Congress) प्रगतीच्या अपेक्षेत आहे. एकेकाळी कॉंग्रेस देशाचा एक प्रमुख पक्ष होता. खरे म्हणजे, कॉंग्रेस हा नुसता राजकीय पक्ष नसून एक विचार आहे, एक चळवळ आहे. कॉंग्रेससारखी परंपरा इतर कोणत्याही पक्षात दिसत नाही. एक मोठा राजकीय पक्ष आज आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडतोय, अशी परिस्थिती मागील काही वर्षांपासून उत्पन्न झाली आहे. आपला कॉंग्रेस पक्ष इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा मागे पडला आहे. आपला पक्ष महाराष्ट्रात सकारात्मक कार्य करताना दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

<iframe width=”560″ height=”315″ src=”https://www.youtube.com/embed/VBtmFdxglj8″ title=”YouTube video player” frameborder=”0″ allow=”accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture; web-share” allowfullscreen></iframe>

नाशिक येथे सुरु असलेल्या उमेदवारीच्या घोळावर देशमुख यांनी पत्रात लिहिले आहे की, “सत्यजीत तांबे यांच्या बंडखोरीने कॉंग्रेसची नामुष्की झाली. यात प्रदेशाध्यक्ष म्हणून श्री. नाना पटोले हेच जबाबदार आहेत. पटोलेंच्या कार्यकाळात पक्षाला सातत्याने नाचक्कीचा सामना करावा लागत आहे. ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून कॉंग्रेसची दाणादाण उडत आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर कॉंग्रेस पुढच्या काळात महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष ठरेल यासाठी आम्ही कामकाज करु, असे त्यांनी ठासून सांगितले होते. ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून कॉंग्रेसची वाताहत सुरु झाली आहे.”

सत्यजित तांबेंच्या या प्रकरणाबाबत पहिली प्रतिक्रिया देताना नाना पटोले आपल्याला याबद्दल काहीच कल्पना नसल्याचे त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्षात बरीच नाराजी निर्माण झाली होती आणि आता सत्यजित तांबेंच्या या बंडखोरीच्या मुद्द्यवरून नाना पटोलेंना गृहीत धरून त्यांना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

नड्डाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, जून २०२४ पर्यंत वाढवला कार्यकाळ

धनुष्यबाण चिन्हांबाबतीत पुढची सुनावणी २० जानेवारीला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss