Congress पुन्हा एकदा ऍक्टिव्हमोडमध्ये!, लवकरच ‘Bharat Jodo Yatra’चं दुसरं पर्व ‘Bharat Nyay Yatra’ होणार सुरु

भारत जोडो यात्रेच्या पहिल्या टप्प्यानंतर आता काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा ऍक्शन मोड मध्ये आला आहे. म्हणजे आता दुसरी यात्रा काढण्याच्या तयारीत आहेत .

Congress पुन्हा एकदा ऍक्टिव्हमोडमध्ये!, लवकरच ‘Bharat Jodo Yatra’चं दुसरं पर्व ‘Bharat Nyay Yatra’ होणार सुरु

२०२२ आणि २०२३ या वर्षांमध्ये काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रा केली होती. संपूर्ण भारतात दिनांक ७ सप्टेंबर २०२२ ते दिनांक ३० जानेवारी २०२३ या कालावधी दरम्यान ही यात्रा सुरु होती. हा प्रवास जवळपास ५ महिने चालू होता. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरातून मोठा प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. भारत जोडो यात्रेच्या पहिल्या टप्प्यानंतर आता काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा ऍक्शन मोड मध्ये आला आहे. म्हणजे आता दुसरी यात्रा काढण्याच्या तयारीत आहेत .

भारत जोडो यात्रेला मिळलेल्या प्रतिसाद नंतर आता काँग्रेस पक्ष लवकरच काँग्रेस भारत न्याय यात्रेला (Bharat Nyay Yatra) सुरुवात करणार आहे. यावेळी काँग्रेसच्या भारत न्याय यात्रेचा प्रवास मणिपूर ते मुंबई असा असेल. या प्रवासात काँग्रेस ६२०० किलोमीटरचं अंतर पार करण्याच्या तयारीत आहे. नवीन वर्षात दिनांक १४ जानेवारी पासून ‘भारत न्याय यात्रा’ सुरु होणार आहे तर दिनांक २० मार्च पर्यंत ही चालणार आहे. भारत न्याय यात्रा १४ राज्यांतील ८५ जिल्ह्यांतून जाणार आहे. भारत न्याय यात्रा मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातून जाणार आहे.

भारत जोडो यात्रेचा मुख्य उद्देश ‘द्वेष, भीती आणि कट्टरता’ या राजकारणाशी लढा देणं हा होता. याशिवाय केंद्र सरकारकडून लोकांच्या आशा-आकांक्षांकडे होणारं दुर्लक्ष आणि राजकीय केंद्रीकरण आणि अन्यायाविरुद्ध लढायचं आहे. तर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांना या यात्रेचं नाव न्याय यात्रा का ठेवलं? असं विचारलं तेव्हा ते म्हणाले की, आम्ही जनतेला आर्थिक, सामाजिक आणि धोरणात्मक न्याय देऊ, असं आश्वासन देऊ इच्छितो. पहिली यात्रा १२ राज्यांतून गेली, तर दुसरी यात्रा १४ राज्यांतून जाणार आहे. तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे या दौऱ्याला हिरवा झेंडा दाखवतील. मात्र, या यात्रेचं नेतृत्व राहुल गांधी करणार की, आणखी कोणी? याबाबत काँग्रेस पक्षाकडून काहीही स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

हे ही वाचा:

‘Vd 18’ चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान वरुण धवणच्या पायाला दुखापत

अ‍ॅनिमलच्या यशानंतर तृपी डिमरी करणार कार्तीक आर्यनसोबत स्क्रीन शेअर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version