spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

तेरा भी वही हाल होता जो तेरी दादी का हुआ, Rahul Gandhi यांना BJP नेत्याने दिली जीवे मारण्याची धमकी

काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. यावेळी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ‘जेव्हा योग्य वेळ येईल, देशात समानता येईल तेव्हा काँग्रेस आरक्षण संपवण्याचा विचार करेल. सध्या ती योग्य वेळ नाही,’ असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानावर आता विरोधकांनी चांगलीच आगपाखड केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह अनेक सत्ताधारी नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच भाजप (BJP) कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींविरुद्ध आंदोलनेदेखील करण्यात आली. अश्यातच आता धक्कादायक बातमी येत असून भाजप नेत्याने यावरून राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धाकी दिली आहे. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याला प्रमाणात व्हायरल होत आहे.

राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडीओ काँग्रेसकडून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये दिल्ली भाजपमधील कार्यकर्ते राहुल गांधी यांच्या १० जनपथ निवास जवळ आंदोलनं करताना दिसत असून राहुल गांधी यांनी अमेरिकेत केलेल्या वक्तव्याची माफी मागताना दिसत आहेत. यादरम्यान भाजप नेता आणि माजी आमदार तरविंदर सिंह मारवाह (Tarwinder Singh Marwah) हा खुलेआमपणे राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देत असताना दिसत आहे. “‘राहुल गांधी, वेळीच सुधरा, नाहीतर भविष्यात तुमचीही आजीसारखीच अवस्था होईल.’ अश्या शब्दांत भाजप नेता धमकी देताना दिसतात आहे. यावरून आता राजकीय वातावरण तापले असून काँग्रेस नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत.

नरेंद्र मोदीजी, तुमच्या पक्षाच्या या नेत्याच्या धमकीवर तुम्ही गप्प बसू शकत नाही, काँग्रेसचा इशारा

याबाबत काँग्रेसच्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून भाष्य करण्यात आले. “दिल्ली भाजपचे नेते आणि माजी आमदार तरविंदर सिंग मारवाह यांनी आज आंदोलनादरम्यान म्हटले: “राहुल गांधी, थांबा, अन्यथा भविष्यात तुम्हालाही तुमच्या आजीप्रमाणेच सामोरे जावे लागेल.” भाजपचा हा नेता उघडपणे देशातील नेत्यांवर टीका करत आहे. विरोधकांना जीवे मारण्याची धमकी देत ​​आहे. नरेंद्र मोदीजी, तुमच्या पक्षाच्या या नेत्याच्या धमकीवर तुम्ही गप्प बसू शकत नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे. तुमच्या पक्षाच्या द्वेषाच्या कारखान्याची ही निर्मिती आहे. यावर कारवाई करावी लागेल,” असे काँग्रेसकडून म्हणण्यात आले आहे.

हे ही वाचा:

Jal Jeevan Mission व Swachh Bharat Mission ची अंमलबजावणी करण्याच्या Gulabrao Patil यांच्या सूचना

देशविरोधी बोलण्याची Rahul Gandhi आणि Congress ची सवय, राहुल गांधींच्या आरक्षणावरील वक्तव्यावरून Amit Shah यांची टीका

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss