नरेंद्र मोदींविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्याला अटक

नरेंद्र मोदींविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्याला अटक

मध्य प्रदेश काँग्रेसचे नेते राजा पटेरिया (Raja Pateria) ) यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या ‘मारण्यासाठी तयार राहा’ या वादग्रस्त वक्तव्यासाठी (Controversial statements) आज त्यांना अटक करण्यात आली. आज पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. पटेरिया यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतरही त्यांना अटक करण्यात आली.

काँग्रेसचे माजी आमदार राज पटेरिया यांच्या भाषणाची एक क्लिप व्हायरल झाली. या व्हिडिओनुसार, राज पटेरिया हे काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. त्यावेळी भाषणात त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. पटेरिया यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूक प्रक्रिया संपुष्टात आणतील. मोदी धर्म, जाती, भाषा या मुद्यांच्या आधारे लोकांमध्ये फूट पाडतील. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समुदायाचे भवितव्य धोक्यात आहे. देशाचे संविधान वाचवायचे असल्यास मोदी यांच्या हत्या करण्यास तयार असले पाहिजे. हत्या म्हणजे, त्यांचा निवडणुकीत पराभव करण्यासाठी काम करा, असे वक्तव्य केले होते. मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील एका गावात त्यांनी भाषण केले. त्यावेळचा हा व्हिडिओ असल्याचे म्हटले जात आहे.

माजी आमदार राज पटेरिया यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. भाजप नेत्यांनी पटेरिया यांच्या वक्तव्याचा निषेध करताना त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. अशा प्रकारच्या मानसिकतेमुळे देशभरातून काँग्रेस संपत चालली असल्याचे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले. या वक्तव्याबाबत काँग्रेसने माफी मागावी अशी मागणीदेखील त्यांनी केली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनीदेखील या वक्तव्यावर टीका केली होती. हे वक्तव्य म्हणजे द्वेषाचे राजकारण असल्याचे त्यांनी म्हटले. या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेतही मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी दिले होते.

हे ही वाचा : 

सुषमा शिरोमणी यांना जीवनगौरव तर पत्रकारितेसाठी रविंद्र पाथरे यांना कलागौरव पुरस्कार जाहीर

मुलतान क्रिकेट स्टेडियमवरील दुसऱ्या कसोटीदरम्यान जसप्रीत बुमराहची कार्बन कॉपी

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version