spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात वॉकिंग करताना पडले, विशेष विमानेने मुंबईला येणार

Maharashtra Assembly Winter Session : सध्या महाराष्ट्रामध्ये हिवाळी अधिवेशन (Assembly Winter Session) सुरु आहे आणि या साठीच सर्व पक्षाचे नेते मंडळी ही नागपूरला आहेत. आज या अधिवेशनामध्ये सहभागी होण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सुद्धा उपस्थित आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या प्रकुर्ती बदल मोठी माहिती समोर येत आहे. काँग्रेस नेते, माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आज ( २६ नोव्हेंबर ) पहाटे सेमिनरी हिल्स (Seminary Hills) परिसरात मॉर्निंग वॉक (Morning walk) करण्यासाठी गेले होते. तेव्हा, बाळासाहेब थोरात पाय घसरून पडले. यामध्ये त्यांच्या हाताचे हाड मोडलं (Broken hand bone) आहे. त्यांना इंदिरा गांधी (Indira Gandhi) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथे दाखल करण्यात आलं आहे. तेथे सर्व तपासण्या झाल्यानंतर त्यांना मुंबईला हलवण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांकडून देण्यात आली.

तत्पूर्वी त्यांना अधिवेशनासाठी तैनात तपासणी अधिकाऱ्यांनी तपासले होते. त्यांना विमानतळावर हलविण्यात आले असून पूढील उपचाराकरिता मुंबईला हलविण्यात येणार असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), प्रणिती शिंदे (Praniti Shinde), यशोमाती ठाकूर (Yashomati Thakur) रुग्णालयात थोरात यांच्या भेटीकरता गेले होते.थोरात यांना जखमी अवस्थेत अधिवेशनासाठी तैनात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथम तपासले होते. मेयोच्या आकस्मिक विभागात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. तातडीने सिटी स्कॅन (City Scan), एम.आर.आय. (M.R.I) सह इतर तपासण्या केल्या गेल्या. त्यात उजव्या हाताचे हाड मोडल्याचे स्पष्ट झालं आहे.

बाळासाहेब थोरात यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली आहे. ‘आज सकाळी नागपूरच्या सेमिनरी हिल इथं मॉर्निंग वॉक करताना पडल्यामुळं माझ्या खांद्याला दुखापत झाली आहे. मी नागपूर इथं प्राथमिक उपचार घेतले आहेत. माझी तब्येत पूर्णपणे बरी असून काळजी करण्याचं कारण नाही. फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्यानं मी पुढील उपचार मुंबईत घेणार आहे, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

हे ही वाचा : 

१८ वर्षांपूर्वी याच दिवशी Tsunami ने केला होता कहर, लाखो लोक पावले होते मरण , जाणून घ्या २६ डिसेंबरचा इतिहास

४७ चिनी विमानांनी हवाई संरक्षण क्षेत्रात प्रवेश केल्याचा तैवानचा दावा

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss