Sunday, July 7, 2024

Latest Posts

मनुस्मृती हा भाजपचा छुपा अजेंडा: Charan Singh Sapra

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा (Manusmriti) समावेश होण्याच्या चर्चा आहेत. काँग्रेसचे (Congress) माजी आमदार चरणसिंह सप्रा (Charan Singh Sapra) यांनी याला जोरदार विरोध केला असून 'हा भाजपचा (BJP) छुपा अजेंडा आहे. त्यांना संविधान बदलायच आहे,' असे म्हंटले आहे.

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा (Manusmriti) समावेश होण्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे, राज्यात मनुस्मृतिवरून राजकारण सुरु झाले आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाने (Maharashtra Education Board) मुलांच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश करण्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अश्यातच आता काँग्रेसचे (Congress) माजी आमदार चरणसिंह सप्रा (Charan Singh Sapra) यांनी याला जोरदार विरोध केला असून ‘हा भाजपचा (BJP) छुपा अजेंडा आहे. त्यांना संविधान बदलायच आहे,’ असे म्हंटले आहे.

चरणसिंह सप्रा यांनी पत्रकारांशी संवाद साधत अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, “हा भाजपचा छुपा अजेंडा आहे. त्यांना संविधान बदलायच आहे. भाजपचे कितीतरी नेते आहेत ज्यांनी उघडपणे जाहीर सभेत सांगितले आहे की आम्हाला संविधान बदलायचे आहे.”

ते पुढे म्हणाले, “इंडिया गठबंधन (INDIA Alliance) सरकार निवडून येणार आहे. इंडिया गठबंधनचे लोक जास्तीत जास्त निवडून येतील. २०१९ मध्ये ज्या राज्यात सीट्स नव्हत्या त्या ठिकाणी सीट्स येणार आहेत.”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावरही त्यांनी यावेळी निशाणा साधला. “मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) नेहमी आढावा बैठक होतात. मात्र मुंबईच्या नाल्यांची साफसफाई नीट होत नाही. दावे करतात कि ६० – ७० % नालेसोफाई झाली आहे, मात्र ३० – ४०% च्यापुढे नालेसफाई कधीच झाली नाही. यावेळी मुंबईची तुंबई झाली नाही पाहिजे. झाली तर त्या संबंधित महानगरपालिकेच्या प्रशासकावर किंवा मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तावर कारवाई झाली पाहिजे.”

जितेंद्र आव्हाड यांचा मनुस्मृती दहन करण्याचा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar) गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा (Manusmriti) समावेश होण्याच्या निर्णयाला जोरदार विरोध केला असून ‘येत्या २९ तारखेला मनुस्मृतीचे दहन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधत सांगितले, “येणाऱ्या २९ तारखेला सगळ्या बहुजनांना एकत्र करून आम्ही मनुस्मृतीचे दहन करणार आहोत. महाड मध्ये. बलिदान गेले तरी चालेल. पण पुस्तकात मनुस्मृती येऊन देणार नाही. स्त्रियांविषयी जे मनुस्मृती मध्ये लिहले आहे ते वाचा. ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केली नाही, तोपर्यंत ब्राह्मण स्त्रियांना देखील शिक्षण घेता येत नव्हतं. १९५० ला संविधान म्हणजेच मनुस्मृती असल्याचे सांगितले. बाबासाहेबांनी महिलांसाठी मनुस्मृती जाळली. तामिळनाडू पेरियार आणि आंबेडकर यांनी विरोध केला. त्यांनी महाडला ज्योती पेटवली तर आता संपूर्ण देशभरात ही ज्योत पेटेल. स्त्रिया म्हणजे पायातल्या चपला असे मनुचे म्हणणं आहे. स्त्रियांना हे पटत का? स्त्री आणि पुरुष समानता मी मानतो.”

हे ही वाचा:

Ajit Pawar यांनाही पराभवाची चाहूल, सहकारी सोबत राहतील का याची चिंता: Atul Londhe

मनुस्मृतीवरून राजकारण तापले, येत्या २९ तारखेला मनुस्मृतीचे दहन कारण्याचा Jitendra Awhad यांचा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss