Mahavikas Aghadi एकत्र Maharashtra Assembly Election लढणार आणि महाभ्रष्ट Mahayuti सरकार उखडून फेकणार: K.C. Venugopal

Mahavikas Aghadi एकत्र Maharashtra Assembly Election लढणार आणि महाभ्रष्ट Mahayuti सरकार उखडून फेकणार: K.C. Venugopal

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल (K. C. Venugopal) व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) यांच्या प्रमुख उपस्थितीत व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या अध्यक्षतेखाली गरवारे क्लब येथे काँग्रेस (Congress) पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज पार पडली. विधानसभा निवडणुकीला (Maharashtra Assembly Election 2024) ताकदीने सामोरे जाणार असून बैठकीत काँग्रेस संघटन मजबूत करण्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी, के. सी. वेणुगोपाल यांनी ‘महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढणार असून तीन पक्ष एकत्रित बसून जागावाटपाची चर्चा करणार आहेत,’ असे वक्तव्य केले आहे. तसेच, महाभ्रष्ट महायुती (Mahayuti) सरकार सत्तेतून उखडून फेकू, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना वेणुगोपाल म्हणाले की, “लोकसभा निवडणुका व त्यानंतर देशभरात झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपाचा सुपडा साफ झालेला आहे. जनतेला महाराष्ट्रातही परिवर्तन हवे आहे. महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढणार असून तीन पक्ष एकत्रित बसून जागावाटपाची चर्चा करणार आहेत. आम्ही मिळून या विधानसभा निवडणुकीत राज्यातील महाभ्रष्ट महायुती सरकार सत्तेतून उखडून फेकू, असा निर्धार आजच्या बैठकीत आम्ही केला,” असे के. सी. वेणुगोपाल म्हणाले.

“राज्यातील महाभ्रष्ट महायुती सरकार सत्तेतून बाहेर काढणे हा काँग्रेस पक्षाचा संकल्प आहे. भारतीय जनता पक्षाने लोकसभा व विधानसभा पोट निवडणुकीतही सरकारी यंत्रणांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला. पण तरीही त्यांचा पराभव झाला. भाजपाचा अयोध्येनंतर बद्रिनाथमध्येही जनतेने पराभव केला आहे. महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनताही राज्यातील भ्रष्ट आणि असंवैधानिक सरकारला सत्तेवरून खाली खेचून परिवर्तन करणार आहे असे चित्र राज्यात आहे.”

पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, “विधान परिषद निवडणुकीत पक्षाच्या ज्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली असून काही दिवसांत आपल्याला त्याची माहिती मिळेल. पक्षात बेशिस्त खपवून घेतली जाणार,” असे के. सी. वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

घटस्फोटाची घोषणा करत HARDIK PANDYA यांनी केले चाहत्यांना आवाहन

विवाहित दांपत्यांसाठी आली नवी खुशखबर ; केला मोठा निर्णय जाहीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version