काँग्रेस नेते नाना पटोलेंची गुजरात निवडणूक निकालावर पहिली प्रतिक्रिया

काँग्रेस नेते नाना पटोलेंची गुजरात निवडणूक निकालावर पहिली प्रतिक्रिया

गुजरातमध्ये (Gujarat) विधानसभेच्या (Gujarat Election Result 2022) १८२ जागांचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला (BJP) बहुमत मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. गुजरातमध्ये (Gujarat News) बहुमतासाठी ९२ जागांची गरज आहे, तर येथे समोर आलेल्या कलांनुसार भाजप सध्या १५० जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसची (Congress) मात्र दाणादाण उडाल्याचं पाहायला मिळत आहे. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी गुजरात निकालावर प्रतिक्रिया व्यक्त केलीय. “गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जची (drugs) आयात झाली आणि तरुणांमध्ये व्यसनाधिनता वाढवली,” असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी व्यक्त केलं. तसेच भय ( fear), भ्रष्टाचार (Corruption), भूक ( hunger) अशा सर्व गोष्टींचा गुजरात निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याचाही त्यांनी आरोप केला.

नाना पटोले म्हणाले, “गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जची आयात झाली. मुंद्रा पोर्टावर (Mundra Port) मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण, भय, भ्रष्टाचार या सर्व गोष्टींचा गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर झाला.” जो निकाल आला त्याचं आम्ही स्वागत करतो. लोकशाहीत मतदानाच्या वेळी भय, भ्रष्टाचार आणि व्यसनाधिनता हे अपेक्षित नाही. आम्हाला गुजरातमध्ये ज्या कमी जागा मिळाल्या त्याचं आम्ही आत्मपरिक्षण करू. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस गुजरातमध्ये चांगली कामगिरी करेल, असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं.

नाना पटोलेंनी निकालावर बोलताना व्यसनाधिनतेचा उल्लेख केल्यावर व्यसनाधिनता आहे म्हणून गुजरातमध्ये भाजपाचा विजय झाला का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “व्यसनाधिनता आहे म्हणून गुजरातमध्ये भाजपाचा विजय झाला असं म्हणालो नाही. भय, भ्रष्टाचार, भूक ही प्रक्रिया वापरण्यात आली. पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर सुरतमध्ये (Surat) दबावतंत्राचा वापर करण्यात आला. आयकर आणि ईडीने (ED) छापे टाकले. हे का विसरले जात आहेत. पहिल्या टप्प्यानंतर जाणीवपूर्वक भय निर्माण करण्यात आलं.”

हे ही वाचा : 

आलिया पाठोपाठ रणबीर करणार का हॉलिवूडमध्ये पदार्पण?

ट्विट करत रोहित पवारांनी साधला केंद्र सरकारवर निशाणा

Gujarat- Himachal Election Result 2022 गुजरातमध्ये विजय पक्का, तर हिमाचलमध्ये भाजपला मोठा धक्का, कोण मारणार बाजी?

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version