‘भारत जोडो’ यात्रेत काँग्रेस नेते नितीन राऊत जखमी

महाराष्ट्र काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) हे 'भारत जोडो' यात्रेत (Bharat Jodo Yatra) जखमी झाले आहेत. हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

‘भारत जोडो’ यात्रेत काँग्रेस नेते नितीन राऊत जखमी

महाराष्ट्र काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) हे ‘भारत जोडो’ यात्रेत (Bharat Jodo Yatra) जखमी झाले आहेत. हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. नितीन राऊत हे हैदराबाद येथे ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झाले होते. त्यावेळी गर्दीत त्यांना धक्का लागला आणि तोल गेल्याने ते पडले. त्यांच्या डाव्या डोळ्याजवळ इजा झाली आहे.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील ‘भारत जोडो’ यात्रा ही ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. महाराष्ट्र प्रदेश कमिटीकडून भारत जोडो यात्रेसाठीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूरपासून भारत जोडो यात्रेचा टप्पा सुरू होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय आदित्य ठाकरेदेखील यात्रेत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. ‘भारत जोडो’ यात्रेतंर्गत राहुल गांधी नांदेड, बुलढाणामध्ये जाहीर सभा घेणार आहेत.

भारत जोडो यात्रेत सहभागी होणारी पूजा भट्ट (Pooja Bhatt) पहिलीच बॉलिवूड सेलिब्रिटी आहे. अभिनेत्री पूजा ही हैदराबादमध्ये यात्रेत सहभागी झाली. तेलंगणातील हैदराबाद शहरातून आज सकाळी ‘भारत जोडो’ यात्रा सुरू झाली. त्यावेळी अभिनेत्री पूजा भट्ट यात्रेत सहभागी झाली.

हे ही वाचा :

Devendra Fadnvis : महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक्स हब होणार; उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन

पंतप्रधान मोदी उद्या गुजरातच्या मोरबीला दुर्घटना स्थळी पाहणीसाठी जाणार

Ashish Shelar : ‘राज ठाकरेंना मी परिपक्व राजकारणी मानतो’ ; ठाकरेंच्या प्रश्नाला आशिष शेलारांचं उत्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version