Watch video : ‘भाईयो और बहनो…’ म्हणत राहुल गांधींनी केली पंतप्रधान मोदींची नक्कल, व्हिडीओमध्ये पाहा

Watch video : ‘भाईयो और बहनो…’ म्हणत राहुल गांधींनी केली पंतप्रधान मोदींची नक्कल, व्हिडीओमध्ये पाहा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ‘भारत जोडो यात्रा’ सध्या मध्य प्रदेशात आहे. महाराष्ट्रातील प्रवास पूर्ण करून भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशमध्ये पोहोचली आहे. भारत जोडो यात्रेने महाराष्ट्राच्या जळगावमधील जामोद येथून बुरहानपूर मार्गे मध्य प्रदेशमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. येथे राहुल गांधी यांनी जनतेला संबोधित केलं. यावेळी राहुल गांधी यांनी भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली.

हेही वाचा : 

Vikram Gokhale : ‘विक्रम गोखलेंवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, कृपया अफवा पसरवू नये’, गोखले कुटुंबीयांचे आवाहन

भाषणात राहुल गांधींनी नरेंद्र मोदींची नक्कल केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी राहुल गांधी उपस्थित जनतेला आपला रोजचा दिनक्रम सांगत आहेत. यावेळी म्हणतात की, ‘कमलनाथ यांनी मला विचारले की, तुम्हाला थकवा येत नाही का..? भाईयो और बनहो…माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला थकवा दिसतो का…मी रोज सकाळी लवकर उठतो भरपूर चालतो, पण मला थकवा येत नाही.’ असा राहुल गांधी यांनी म्हटले.

राहुल गांधींचा नवा अंदाज व्हायरल

राहुल गांधी यांनी ‘भाईयो और बहनो…’ मिश्किल अंदाजात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. राहुल गांधींचे हे शब्द ऐकताच जमाव राहुल गांधी जिंदाबादच्या घोषणा देऊ लागला. राहुल गांधी काही वेळ थांबून घोषणाबाजी थांबवण्याचा प्रयत्न करतात. राहुल गांधी यांनी ‘भाईयो और बहनो…’ म्हणताच जमावात मोठा उत्साह पाहायला मिळाला. राहुल गांधींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर काही जण राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ कमेंट करत आहेत तर काहीजण त्यांच्या विरोधातही आहेत.

अरबी समुद्रात जलसमाधी घेणार, हिंमत असेल तर अडवून दाखवा; शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर

दररोज २१ कि.मी. प्रवास

‘भारत जोडो’ यात्रा आतापर्यंत सहा राज्यांमधून गेली असून यात्रेत राहुल गांधी इतर सहभागींबरोबर दररोज २१ कि.मी. चालत आहेत, अशी माहितीही रमेश यांनी दिली. त्याचप्रमाणे, यात्रा महाराष्ट्रात असताना काही दिवशी ते दररोज २४ कि.मी. अंतर चालले. जंगलाचा परिसर बसमधून ओलांडण्यात आला, असेही त्यांनी सांगितले. ही यात्रा तमिळनाडूतील कन्याकुमारीपासून सात सप्टेंबरला सुरू झाली.

Exit mobile version