Devendra Fadnavis यांनी ‘व्होट जिहाद’ हा शब्द वापरणे म्हणजे संविधानाचा अपमान; Congress नेत्याचा जोरदार हल्लाबोल

Devendra Fadnavis यांनी ‘व्होट जिहाद’ हा शब्द वापरणे म्हणजे संविधानाचा अपमान; Congress नेत्याचा जोरदार हल्लाबोल

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने राज्यात आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे राज्यभरात ठिकठिकाणी दौरे, सभा, बैठका आणि यात्रा पार पाडल्या जात आहेत. अश्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सभा काल (सोमवार ३० सप्टेंबर) कोल्हापूर येथे पार पडली. यावेळी उपस्थितांसमोर भाषण करताना फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात व्होट जिहाद झाल्याचा खळबळजनक दावा केला असून आता यावरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. राजकीय नेत्यांच्या यावरून प्रतिक्रिया येऊ लागल्या असून यावरून आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. अश्यातच काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी, ‘फडणवीसांनी व्होट जिहाद हा शब्द वापरणे म्हणजे संविधानाचा अपमान’ असल्याचे म्हंटले आहे.

‘लोकसभा निवडणुकीत ४८ मतदारसंघांपैकी १४ मत्तदारसंघ आहेत. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्होट जिहाद झाला असल्याचा गंभीर दावा फडणवीस यांनी केला आहे. फडणवीसांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात मिळालेल्या अपयशाच्या मुख्य कारणांपैकी एक म्हणजे मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात केलेले मतदान. यावरून आता देवेंद्र फडणवीसांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी पावले उचलल्याचे स्पष्ट होत आहे. महाविकास आघाडीला मिळालेल्या मुस्लिम मतदानावरून टीका करत ‘व्होट जिहाद’ झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

काय म्हणाले सचिन सावंत?

सचिन सावंत यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट करत फडणवीसनावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे संविधानिक पदावर बसले आहेत. फडणवीसांनी व्होट जिहाद हा शब्द वापरणे म्हणजे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने जो मतांचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला दिला आहे त्याचा संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने केलेला अवमान आहे. संविधानाचा अनादर आहे. संविधाना आधारे घेतलेल्या शपथेचा भंग आहे. प्रथमतः मुस्लिम समाज भाजपाला मतदान का करत नाही? याचा विचार फडणवीसांनी व भाजपा नेत्यांनी केला पाहिजे. भाजपाच्या पक्षघटनेत सर्वधर्मसमभाव आणि गांधीवादाचा मार्ग आहे याचा विसर भाजपाला पडला आहे हे याचे मूळ कारण आहे. जम्मू काश्मीर मध्ये मुस्लिम सणांना दोन सिलिंडर मोफत देणारी महाराष्ट्रात भाजपा नितेश राणे आणि रामगिरी महाराजांच्या पाठिशी उभी राहते. मुसलमानांना जाणिवपूर्वक लक्ष्य केले जाते. तुम्हाला मुस्लिम मते मिळावीत असे वाटत असेल तर जो जो द्वेष पसरतो त्याला संरक्षण देऊ नका. धार्मिक भेदभावाला चालना देऊ नका. केवळ दिखाव्यासाठी संविधानाची मंदिरे उभारुन चालत नाही, संविधानाला नागरिक व नेता म्हणून आपल्या जीवनाचा भाग करावा लागतो,” असे ते म्हणाले.

फडणवीसांचा मंत्रिपदाची शपथ घेतानाचा व्हिडीओ पोस्ट करत ते पुढे म्हणाले, “फडणवीस साहेब, आपण घेतलेल्या मंत्रीपदाच्या शपथेतील महत्वाचा भाग आपल्या आठवणीसाठी-“कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रध्दा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन.” यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतानाचा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी त्यांच्यावर टीका केली.

हे ही वाचा:

व्होट जिहादमुळे लोकसभेत पराभव, Devendra Fadnavis यांचा मोठा दावा

दसऱ्याला मराठा समाज नारायणगडाकडे कूच करणार, Manoj Jarange Patil यांच्या दसरा मेळव्यावर अखेर शिक्कामोर्तब

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version