भरत गोगवलेचे कट्टर विरोधक काँग्रेस नेत्या स्नेहल जगताप पोहचल्या मातोश्रीवर

भरत गोगवलेचे कट्टर विरोधक काँग्रेस नेत्या स्नेहल जगताप पोहचल्या मातोश्रीवर

काही महिन्यापूर्वी शिवसेनेमध्ये मोठा बंड झाला त्यानंतर खरी शिवसेना कोणती यावरून दोन्ही गटांत वाद सुरु असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा पक्ष उभारणीसाठी पूर्ण प्रयत्न करत आहे . शिंदे गटातील आमदार-मंत्र्यांना घेरण्यासाठी ठाकरे गटाची रणनीती सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे, संजय राठोड, संतोष बांगर यासारख्या नेत्यांच्या मतदारसंघात नवे शिलेदार उभे केल्यानंतर आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भरत गोगावलेंच्या (Bharat Gogawale) कट्टर विरोधकाला साद घातली आहे. महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि काँग्रेस नेत्या स्नेहल जगताप कामत (Snehal Jagtap Kamat) यांनी नुकतीच ‘मातोश्री’वर भेट दिली.

रायगडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि काँग्रेस नेत्या स्नेहल जगताप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर आल्या होत्या. यावेळी शिवसेना नेते आणि माजी मंत्री सुभाष देसाईही सोबत होते.

स्नेहल जगताप या कोकणातील महाड विधानसभा मतदारसंघातील शिंदे समर्थक आमदार भरत गोगावले यांच्या कट्टर राजकीय विरोधक मानल्या जातात. त्या माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या आहेत. महाडमधील प्रमुख राजकीय नेत्यांपैकी त्या एक आहेत. स्नेहल जगताप यांना चार ते पाच वेळा मातोश्रीवर येण्यासाठी निमंत्रण देण्यात आल्याचं बाोललं जातं. अखेर दोन दिवसांपूर्वी जगताप-ठाकरेंची भेट झाल्याची माहिती आहे. स्नेहल जगताप शिवबंधन बांधणार का, अशा चर्चांनाही राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. मात्र ही निव्वळ सदिच्छा भेट असल्याचा दावा दोन्ही बाजूंनी केला जात आहे. परंतु २०२४ मधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच ठाकरेंनी मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचं दिसतंय.

हे ही वाचा :

India Vs Pakistan Live Streaming : T20 World Cup चा ‘महामुकाबाला’ कधी आणि कसा पाहायचा?, जाणून घ्या सविस्तर

शिंदे, फडणवीस राज ठाकरे यांच्या मनात उद्धव ठाकरेंची दहशत – अंबादास दानवे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version