राहुल गांधीच्या कॉंग्रेस अध्यक्षपदाला पक्षातीलच नेत्यांचा विरोध

काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक (Congress Presidential Election) होत आहे. कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणूकीवरून सध्या पक्षांतर्गत वातावरण तापताना दिसत आहेत.

राहुल गांधीच्या कॉंग्रेस अध्यक्षपदाला पक्षातीलच नेत्यांचा विरोध

काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक (Congress Presidential Election) होत आहे. कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणूकीवरून सध्या पक्षांतर्गत वातावरण तापताना दिसत आहेत. दरम्यान याच मुद्द्यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद (National Presidentship of Congress) स्वीकरावे असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. मात्र, या बैठकीत राहुल गांधी यांच्या बिनविरोध काँग्रेस अध्यक्ष होण्याच्या ठरावाला राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी विरोध केला आहे. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता हळू हळू बाहेर येऊ लागले आहेत.

राहुल गांधी यांच्या बिनविरोध निवडीचा ठराव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने काल मंजूर केला. हा प्रस्ताव माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ठेवला होता. या प्रस्तावाला उपस्थित सर्व प्रतिनिधींनी हात उंचावून समर्थन दिलं. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यावेळी हातवर केला नाही. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी आणि राहुल गांधी यांनी त्यात भाग घ्यावा, अशी पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका आहे. पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसच्या G-२३ गटातील आहेत. पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष हवा, अशी G-२३ गटाची मागणी आहे. त्यामुळे त्यांचा राहुल गांधी यांच्या बिनविरोध निवडीला विरोध आहे.

काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. या कार्यक्रमांतर्गत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया २४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत चालणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख तारीख ८ ऑक्टोबर आहे. १७ ऑक्टोबरला निवडणुका होणार असून १९ ऑक्टोबरला निकाल लागणार आहे

सोमवारी (१९ सप्टेंबर) पक्षातील नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींची बैठक मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृह इथे पार पडली. या बैठकीत हा ठराव मांडण्यात आला होता. जो एकमताने मंजूर करण्यात आला आहे. या बैठकीला प्रदेश निवडणूक अधिकारी, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, प्रदेश प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.

हे ही वाचा:

दसरा मेळावा वादात आता राऊतांची उडी, दिला मोलाचा सल्ला

ऊंदीरमामाच्या करामती, अख्ख्या शहराचा पाणीपुरवठा बंद !

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version