आंबादास दानवे यांच्या विरोधी पक्षनेतेपदाला काँग्रेसचा विरोध

राज्यात शिंदे गट आणि भाजप यांनी आपले सरकार स्थापन केले आहे. तर आता शिनवसेनेमधून शिवसेनेचे आंबादास दानवे (Ambadas Danve) यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी (Vidhan Parishad Opposition Leader) निवड झाली आहे.

आंबादास दानवे यांच्या विरोधी पक्षनेतेपदाला काँग्रेसचा विरोध

मुंबई :- राज्यात शिंदे गट आणि फडणवीस यांनी आपले सरकार स्थापन केले आहे. तर आता शिनवसेनेमधून शिवसेनेचे आंबादास दानवे (Ambadas Danve) यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी (Vidhan Parishad Opposition Leader) निवड झाली आहे. परंतु महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस (Congress) पक्षाने यावर आक्षेप घेतला आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद आम्हालाच मिळाला पाहिजे. दुर्दैवाने शिवसेनेकडून आम्हाला विचारणा झाली नाही हा आमचा आक्षेप, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Congress leader Balasaheb Thorat) म्हणाले. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देखील याला विरोध दर्शवला आहे.

शिवसेनमधून अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे आणि या सर्व प्रकरणी त्यांना काँग्रेसमधून विरोध देखील दर्शवला जात आहे. यावर शिवसेनेचे अरविंद सावंत म्हणाले, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाने ९ ऑगस्ट रोजी अधिसूचना काढून शिवसेनेला विधानपरिषदेतील विरोधी पक्ष म्हणून अधिकृत मान्यता दिली. तसेच शिवसेनेकडून विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती करण्यात आली. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांशी विचारविनिमय करुनच अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी दिली होती. संख्येचा विचार केला तर संख्याबळ पण आमच्याकडे आहे, आपापसातील कोऑर्डिनेशन सुद्धा आहे, असं अरविंद सावंत म्हणाले होते.

यासर्व प्रकरणी काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे तर विधानसभेमध्ये उपसभापतीपद शिवसेनेकडे आहे. त्यामुळे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते पद हे आम्हाला मिळाला पाहिजे, अशी आमची आग्रही भूमिका असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी आज जळगावात दिली आहे. पुढे बाळासाहेब थोरात म्हणाले, “संख्याबळ पाहता जवळपास सर्व समान असल्याने काँग्रेसलाच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद देणे आवश्यक असून याबाबत गुरुवारी (११ ऑगस्ट) तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार असून या याबाबत चर्चा होईल.” “दुर्दैवाने शिवसेनेकडून विचारणा झाली नाही हा आमचा आक्षेप असून आम्ही जर मित्र आहोत, आघाडी आहे तर एकामेकांशी बोललं पाहिजे,” अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली. तर दुसरीकडे नाना पाटोळे यांनी देखील विरोध दर्शवला आहे. शिवसेनेने विधीमंडळाच्या वरिष्ठ सभागृहातील विरोधी पक्षनेता केला त्याला आमचा विरोध आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. नाना पटोले हे संपूर्ण राज्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव रॅली निमित्त बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, तेव्हा पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेच्या अंबादास दानवे यांची निवड केल्याबद्द नाराजी व्यक्त केली.

हे ही वाचा :-

बाळासाहेब थोरातांनी जीएसटीवरून मोदींना लगावला टोला

Exit mobile version