Congress President : मल्लिकार्जुन खर्गे आज अध्यक्षपदाची सुत्रे घेणार हाती

काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) हे आज काँग्रेस अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेणार आहेत. अध्यक्षपदाची धुरा हाती घेण्यापूर्वी दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर खर्गेंच्या अभिनंदनाचे पोस्टर लावण्यात आले आहेत.

Congress President : मल्लिकार्जुन खर्गे आज अध्यक्षपदाची सुत्रे घेणार हाती

काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) हे आज काँग्रेस अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेणार आहेत. अध्यक्षपदाची धुरा हाती घेण्यापूर्वी दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर खर्गेंच्या अभिनंदनाचे पोस्टर लावण्यात आले आहेत. दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष बनल्यानं त्यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर उभा आहे. कारण येत्या काही दिवसांमध्येच अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. यामध्ये काँग्रेसची कामगिरी कशी राहणार, निवडणुकांच्या दृष्टीनं खर्गे नेमकं कसं नियोजन करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मलिक्कार्जुन खरगे(Mallikarjun Kharge) आजपासून कॉंग्रेस अध्यक्षपदाची (Congress President) सुत्रे हातात घेणार आहेत. तरी यावेळी सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधीसह (Rahul Gandhi) कॉंग्रेसचे अनेक बडे नेते हजेरी लावणार आहे. मलिक्कार्जुन खरगे हे तब्बल २४ वर्षांनंतर कॉंग्रेसचे अध्यक्ष असणार आहेत जे गांधी घराण्यातील नाहीत. या पदभारासोबतच कॉंग्रेस पुढील अनेक मोठी आव्हाने मलिक्कार्जुन खरगेंना पेलावी लागणार आहे. येणाऱ्या काही महिन्यातचं गुजरात (Gujarat), हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) सारख्या मोठ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका (Vidhan Sabha Elaction) आहेत. तसेच कॉंग्रेसच्या हातात आता फक्त बोटावर मोजण्या इतक्या राज्यात सत्ता बाकी आहे. म्हणून या निवडणुकांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत मोहिम फत्ते करणं हे कॉंग्रेस पूढील मोठं आणि महत्वाचं आव्हान असणार आहे. तरी आज अध्यक्ष पदाची सुत्र हातात घेतल्या नंतर कॉंग्रेस बाबतीत मलिक्कार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) काय मोठे निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांमध्ये चांगलं काम करण्याचं काँग्रेससमोर मोठं आव्हान आहे. तर राजस्थान आणि कर्नाटकमध्ये पक्षांतर्गत सुरु असलेली धुसपूस पक्षाच्या अडचणीत भर पडली आहे. अशा परिस्थितीत २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी पक्षाची एकजूट करणं हे खर्गे यांच्यासाठी मोठे आव्हान असणार आहे.

येत्या काही आठवड्यांमध्येच गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडुकांचं मोठं आव्हान खर्गेंसमोर आहे. त्याचवेळी २०२४ ची लोकसभा निवडणूक त्यांच्यासाठी सर्वात मोठी परीक्षा असेल. दरम्यान, आज सकाळी खर्गे सोनिया गांधींसह पक्षाच्या अन्य नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. कर्नाटकातील दलित समाजातील ८० वर्षीय खर्गे यांनी १७ ऑक्टोबर रोजी झालेल्या ऐतिहासिक निवडणुकीत त्यांचे प्रतिस्पर्धी ६६ वर्षीय थरुर यांचा पराभव केला होता. पक्षाच्या १३७ वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. तब्बल २४ वर्षांनंतर गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीला काँग्रेसचं अध्यक्षपद मिळालं आहे.

हे ही वाचा:

Cabinet Expansion: राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार – देवेंद्र फडणवीस

डव आणि ट्रेसमे शॅम्पूमुळे कर्करोगाचा धोका ! युनिलिव्हरने उत्पादने परत मागवली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version