spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

काँग्रेसने केले भारत चीन सीमावादावरुन मोदी सरकारला प्रश्न

भारत आणि चीन सीमावादाच्या प्रकरणामध्ये काँग्रेसने मोदी सरकारवर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसने मोदी सरकारवर एकापाठोपाठ एक प्रश्न उपस्थित केले आहेत.

भारत आणि चीन सीमावादाच्या प्रकरणामध्ये काँग्रेसने मोदी सरकारवर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसने मोदी सरकारवर एकापाठोपाठ एक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचबरोबर मोदी सरकारने याबाबतीत श्वेतपत्रिका काढावी. गलवान खोऱ्यातील संघर्षाच्या घटनेला तीन वर्षे काल पूर्ण झाले आहेत. संसदेत सविस्तर चर्चा घडवावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. भारतीय लष्कराने सीमेवर ६५ पैकी २६ टेहाळणी नाक्यांचा ताबा गमावला आहे हे खरं आहे का? असा प्रश्न तिवारी यांनी उपस्थित केला आहे.

१९ जून २०२० मध्ये गलवान सीमेवर भारत आणि चीन दरम्यान चममक घडलेली होती. त्यांनतर बराच काळ हा तणाव कायम होता. सीमेवरची स्थिती काहीशी शांत असली तरी त्यावरून राजकारण मात्र शांत होताना दिसत नाही. मागील तीन वर्षांमध्ये याबाबतीत १८ वेळा चीन भारत सीमेवर लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली आहे. परंतु त्यांनंतरही सरकार अधिकृत माहिती संसदेला हा देत नाही असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे. पंतप्रधानांनी १९ जानेवारी २०२० ला केलेल्या वक्तव्यातून एक प्रकारे चीनला क्लीन चिटच दिल्याचा आरोप काँग्रेसने केला. भारत चीनमध्ये तणाव झाल्यानंतर सलग काही महिने हा तणाव कायम राहिला आहे.

भारतीय हद्दीमधील दोन हजार चौरस किमी जमीन चीनने बळकावली हे खरं आहे का..आपण ती परत मिळवू शकलो आहे का याबाबत सरकारने माहिती द्यावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. संसदेच्या बजेट अधिवेशनामध्ये विरोधकांनी सातत्याने भारत-चीन सीमेबाबत सविस्तर चर्चेत मागणी केली होती. परंतु सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद आला नव्हता. आता येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा पुन्हा तापणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

हे ही वाचा:

Ashadhi Wari 2023, मुक्ताबाईंच्या पालखीचा विसावा वाकवड येथे तर धंदेवाडीत नाथांच्या पालखीचे उभे रिंगण

Mumbai Police यांच्याकडून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस, खोके दिन, गद्दार दिन साजरा…

Ashadhi Ekadashi 2023, आजपासून निघणार आषाढी यात्रेसाठी देवाचा पलंग…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss