Wednesday, September 25, 2024

Latest Posts

Akshay Shinde Encounter: एन्काऊंटरचा आदेश देण्यात आला होता का? Congress प्रवक्त्याचा CM Eknath Shinde, Devendra Fadnavis यांना सवाल

Akshay Shinde Encountar: बदलापूर येथील शाळकरी अल्पवयीन झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर (Akshay Shinde Encounter) केल्याची घटना सोमवारी (२३ सप्टेंबर) घडली. आरोपीला तळोजा कारागृहातून बदलापूकडे घेऊन जात असताना आरोपीने पोलिसांकडून पिस्तूल हिसकावत तीन राउंड फायर केले. यादरम्यान पोलिसांनी सेल्फ डिफेन्ससाठी अक्षय शिंदेंवर गोळीबार केला. यात त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली असून महायुतीच्या (Mahayuti) कार्यकर्त्यांनी यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना याचे श्रेय दिले आहे. यावरून आता मुंबई काँग्रेसचे (Congress) प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

सचिन सावंत याविषयी बोलताना म्हणाले, “बदलापूर येथे चिमुरड्यांवर झालेल्या बलात्कारांच्या आरोपीला मारुन न्याय दिला असा बोभाटा आणि स्वतःच स्वतःची पाठ थोपटण्याचे काम महायुती करत आहे. एकेठिकाणी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ हत्या केली असे म्हणतात आणि दुसरीकडे एकनाथ एकन्याय किंवा ” देवा”चा न्याय म्हणून श्रेय घेतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूर आरोपीचा एन्काऊंटर करण्याचा आदेश दिला होता का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

प्रश्न अजून अनेक अनुत्तरित असून शाळेच्या ट्रस्टीना वाचविले जात आहे असा हल्लाबोल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे व सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. ते पुढे म्हणाले की, “आरोपीने बंदूक हिसकावून घेणे हा पोलिसांचा हलगर्जीपणा नाही का? इन्स्पेक्टर संजय शिंदे यांच्या हातून विजय पालांडे नावाचा आरोपी निसटला होता. त्यावर त्यांचे निलंबन झाले होते. अशा अधिकाऱ्यावर आरोपीला नेण्याची जबाबदारी का टाकण्यात आली? सरकार म्हणते की पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ कारवाई केली. महायुतीचे नेते निसर्गाने न्याय दिला म्हणतात मग एकनाथ एकन्याय किंवा देवाभाऊचा न्याय अशा घोषणा का? या प्रकरणी अजून आपटे नावाचा आरोपी महिना झाला तरी फरार आहे. जर आपटेने काही केले नाही तर मग तो फरार का झाला? पोलिसांना आपटेला पकडण्यात येत असलेले अपयश हा एकन्याय की दोन प्रकारचा न्याय? मनसुख हिरेन हत्या व अक्षय शिंदे याची तथाकथित स्वसंरक्षणार्थ पोलीसांनी केलेली हत्या याची सीसीटीव्ही नसलेली जागा एकच कशी? सचिन वाजे आणि संजय शिंदे हे प्रदीप शर्मा यांच्या टीममधील हा योगायोग आहे का?”
अशा प्रश्नांची सरबत्ती करत त्यांनी गृह विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

“शाळेतील एखादा कर्मचारी नराधम निघाला तर सीसीटीव्ही फुटेज गायब कसे व का झाले? व कुणी केले? आपटे नावाचा आरोपी मिळाल्यावर अक्षय शिंदे या नराधमाच्या समोर त्याची उलटतपासणी झाली नसती का? अक्षय शिंदे या नराधमाच्या जाण्याने पुढे तपास पूर्णत्वास कसा जाईल? जर सगळेच बरोबर तर सीआयडी चौकशी का लावावी लागली? असे प्रश्न उपस्थिती होत असून सरकारला याचं उत्तर द्यावं लागलं.या प्रकारात अजून खोलात जाण्याची आवश्यकता आहे. सरकारच्या भूमिकेवर घटना घडल्या पासून प्रश्न उपस्थित होत आहेत. न्याय देण्यापेक्षा प्रकरण संपवून टाकावे हाच उद्देश दिसतो. अजूनही चिमुरड्यांच्या परिवाराला सरकारतर्फे जाहीर केलेली मदत दिली गेली नाही. त्यामुळे न्यायालयीन चौकशीच गरजेची आहे,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.

हे ही वाचा:

Akshay Shinde Encounter : Sharmila Thackeray यांची थेट भूमिका, असे एन्काऊंटर झाले पाहिजेत…

Akshay Shinde Encounter : एन्काऊंटर होऊच शकत नाही; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला धरले धारेवर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss