spot_img
Monday, September 16, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Devendra Fadnavis यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पिछाडीवर होता तो CM Eknath Shinde यांच्या नेतृत्वाखाली पुढे गेला; Congress चा टोला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (शुक्रवार, ६ सप्टेंबर) आपल्या ‘X’ अकाऊंटवरून मोठी बातमी देत संपूर्ण देशात महाराष्ट्र परकीय गुंतवणूकीत पाहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगितले आहे. देशातील एकूण गुंतवणुकीच्या ५२.४६ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच, 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जून २०२४ या पहिल्या तिमाहीत एकूण ७०,७९५ कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. अभिनंदन महाराष्ट्र म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी X वर पोस्ट शेअर केली आहे. यावरून आता विरोधकांनी फडणवीसांवर निशाण साधला आहे. यावर आता काँग्रेस (Congress) प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी यावर मोठी प्रतिक्रिया देत, “फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पिछाडीवर होता तो एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुढे गेला,” अशी खोचक टीका केली आहे.

काय म्हणाले सचिन सावंत?

सचिन सावंत यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट करत फडणवीसांना टोला मारला आहे. ते म्हणाले, “आम्ही सातत्याने म्हणत आहोत की मोदी सरकारने महाराष्ट्राचे पाय खेचले नाहीत तर महाराष्ट्र कायम नं १ वर होता आणि राहिल. फडणवीस साहेबांच्या टीमने ट्विट करताना थोडासा विचार करायला हवा होता. मग हा मुखभंग टळला असता. या ट्विटचा अर्थ असा होतो की फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पिछाडीवर होता तो एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुढे गेला. फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात पाच वर्षात जे जमले नाही ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अडीच वर्षांत जमले असा अर्थ निघतो. या ट्विट नुसार, फडणवीस सरकारच्या ५ वर्षाच्या काळात ₹३,६२,१६१ कोटी परकीय गुंतवणूक आली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत ₹३.१४,३१८ कोटी आले.”

“असो आमचे म्हणणे ही तेच होते की महाराष्ट्र फडणवीस सरकारच्या काळात मागे गेला होता.परंतु उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मविआ सरकारच्या अडीच वर्षांत ऑक्टोबर २०१९ ते जून २०२२ या काळात महाराष्ट्राला एकूण ₹३,२९,२९१ कोटी गुंतवणूक आली होती. म्हणजे मविआ सरकारचा आकडा डबल इंजिन चे सरकार असूनही अजूनही शिंदे सरकारला गाठता आला नाही. एप्रिल ते मार्च २०२०-२१ या काळात मोदी सरकारने कम्प्युटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांमधील त्या वर्षी देशात आलेल्या एकूण गुंतवणूकीच्या ७८% गुंतवणूक गुजरातला पाठवली नसती तर आमच्या काळात आलेल्या गुंतवणूकीत अजून जवळपास १ लाख कोटी वाढले असते आणि मग मविआच्या जवळपासही तुम्हाला यावेळीही जाता आले नसते. मोदी सरकारची नजर लागली नाही तर महाराष्ट्र यापेक्षाही अधिक प्रगती करेल हे तितकेच सत्य आहे,” असे ते म्हणाले.

महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत एक नंबर, फडणवीसांचा दावा

देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली असल्याची माहिती आज देवेंद्र फडणवीस वयानी दिली. यावेळी ते म्हणाले, “गेले दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1 वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. कर्नाटक (19,059 कोटी), दिल्ली (10,788 कोटी), तेलंगणा (9023 कोटी), गुजरात (8508 कोटी), तामिळनाडू (8325 कोटी), हरयाणा (5818 कोटी), उत्तरप्रदेश (370 कोटी), राजस्थान (311 कोटी) या सर्वांच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. थोडक्यात सांगायचे तर या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही 1,34,959 कोटी रुपये इतकी असून, त्यापैकी 70,795 कोटी अर्थात 52.46 टक्के एकट्या महाराष्ट्रात आली आहे. यापूर्वी 2022-23 मध्ये 1,18,422 कोटी म्हणजेच कर्नाटक, दिल्ली, गुजरात यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक आणि 2023-24 मध्ये 1,25,101 कोटी म्हणजेच गुजरातपेक्षा दुपटीहून अधिक आणि गुजरात+कर्नाटक यांच्या बेरजेहून अधिक आहे.

हे ही वाचा:

CM Eknath Shinde यांच्या हस्ते मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे “मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष” लोकार्पण सोहळा संपन्न

महाराष्ट्राचा स्वाभिमान मोदीकडे गहाण ठेवू नका, राज्यात मविआचे सरकार आणा: Mallikarjun Kharge

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss