मुंबईत ११ तारखेला काँग्रेसचा मशाल मोर्चा, महाविकास आघाडीचे सर्व नेते लावणार हजेरी

Congress Mashal March : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे लोकसभेचे सद्सत्व रद्द केल्यानंतर देशभरात काँग्रेसच्या वतीन निदर्शने केली जात आहेत. प्रथम दिल्लीत राजपथावर काँग्रेच्या वतीने संकल्प सत्याग्रह पुकारला (Sankalp Satyagraha) गेला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संकल्प सत्याग्रह पुकारला गेला. राहुल गांधींवर सुरु असलेल्या कारवाईच्या विरोधात काँग्रेस आता पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे.

मुंबईत ११ तारखेला काँग्रेसचा मशाल मोर्चा, महाविकास आघाडीचे सर्व नेते लावणार हजेरी

Congress Mashal March : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे लोकसभेचे सद्सत्व रद्द केल्यानंतर देशभरात काँग्रेसच्या वतीन निदर्शने केली जात आहेत. प्रथम दिल्लीत राजपथावर काँग्रेच्या वतीने संकल्प सत्याग्रह पुकारला (Sankalp Satyagraha) गेला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संकल्प सत्याग्रह पुकारला गेला. राहुल गांधींवर सुरु असलेल्या कारवाईच्या विरोधात काँग्रेस आता पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. काल काँग्रेसच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ११ एप्रिल रोजी मुंबईत मशाल मोर्चा ( Mashal March) काढण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या मशाल मोर्चाची सुरुवात माहीम (Mahim) येथून होणार असून दादरच्या चैत्यभूमी (dadar chaityabhumi) परिसरात मोर्चाची सांगता होणार आहे. या मशाल मोर्चाला महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सर्व नेते उपस्थित राहणार असल्याचं समोर आलं आहे.

महाराष्ट्रातील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) सरकार विरोधात महाविकास आघाडीने वज्रमूठ (vajramuth sabha) आवळली आहे. महाविकास आघाडी संपूर्ण राज्यात एकूण १६ सभाघेणार आहेत. महाविकास आघाडीची पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते. या सभेत विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी निवडणुकी संदर्भात महत्त्वपूर्ण विधान केले. महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्याच्या निवडुका (2023 Brihanmumbai Municipal Corporation Election) व लोकसभा निवडणूक (lok sabha election 2023) एकत्र लढणार असल्याचं पवार म्हणाले. महाविकास आघाडीचा कणा असणारे कार्यकर्ते जीवाचे रान करतील, असा विश्वास असल्याचे त्यांनी ता सभेत व्यक्त केला. आता पेटून उठावे लागेल, एकाच हातात घड्याळ पंजा आणि मशाल आहे. हा एकोपा टिकविण्यासाठी आम्ही जीवाचे रान करणार आहोत, आपणही एकोपा टिकवा, असे आवाहन त्यांनी वज्रमूठ सभेत केले होते .

हे ही वाचा : 

साईबाबांबद्दलच्या ‘त्या’ विधानावर दिलं धीरेंद्र शास्त्रींनी दिले स्पष्टीकरण

देशभरात हनुमान जयंतीचा जल्लोष, वर्षातून दोन वेळा का साजरी केली जाते हनुमान जयंती

भाजपला पोहचायचंय राज्यातल्या ३ कोटी कुटुंबात. Maha #BJP would like to make space in 3 cr. Family

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version