spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Congress ला मोठा मिळणार फटका; JItesh Antapurkar करणार BJP मध्ये एन्ट्री

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक नवनवीन घडामोडी समोर येत आहेत. या निवडणूका म्हटल्यावर दौरे, बैठका, आंदोलने, इ. सारख्या अनेक गोष्टी या आल्याचं. त्यासोबत अनेक नेत्यांचे, पक्ष सादस्यांचे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणे हे तर झालेच. ज्याचे पारडे जड तिथे अनेक पक्ष सदस्य, नेते यांचे स्थलांतरण होतच असते. अशातच आता काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून संशयाच्या भोवऱ्यात असलेले काँग्रेसचे देगलूर विधानसभा मतदारसंघातील आमदार जितेश अंतापूरकर यांनी आपल्या पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. ते आता लवकरच भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) आणि काँग्रेसचे काही आमदार हायकमांडच्या रडारवर असल्याची चर्चा होती. विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाची काही मतं फुटली होती. या आमदारांची नेमकी नावं समोर आली नव्हती. मात्र, क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांमध्ये जितेश अंतापूरकर यांच्या नावाचा समावेश होता. जितेश अंतापूरकर कधीही पक्षाची साथ सोडून महायुतीसोबत जातील, अशी चर्चा सातत्याने राजकीय वर्तुळात रंगली होती. 

काही दिवसांपूर्वीच जितेश अंतापूरकर आणि हिरामण खोसकर यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. या भेटीविषयी जितेश अंतापूरकर यांना विचारण्यात आले असता त्यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचे वृत्त फेटाळून लावले होते. मी माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्याचे स्पष्टीकरण अंतापूरकर यांनी दिले होते. मात्र, आता त्यांनी काँग्रेस पक्षातून राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. ते आज (३०ऑगस्ट) दुपारी दोन वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. 

जितेश अंतापूरकर यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून तिकीट नाकारले जाण्याच्या भीतीने हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांमध्ये जितेश अंतापूरकर यांचा समावेश होता, असा काँग्रेस नेत्यांना विश्वास होता. सुरुवातीला काँग्रेस पक्षाकडून या फुटीर नेत्यांवर कठोर कारवाई होईल, असे सांगितले जात होते. मात्र, काँग्रेस हायकमांडने या फुटीर आमदारांबाबत एक वेगळीच चाल खेळली होती.  क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर थेट कारवाई करण्याऐवजी त्यांना गाफील ठेवून विधानसभा निवडणुकीत तिकीट देऊ नये, असे आदेश  काँग्रेस हायकमांडने स्थानिक नेतृत्त्वाला दिल्याची चर्चा होती. आगामी राजकारणातील हा धोका लक्षात घेऊनच जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केल्याचे सांगितले जाते. 

हे ही वाचा:

“आदिवासी भागातील PESA कायद्यांतर्गत भरतीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक”; Cm Eknath Shinde यांची ग्वाही

छ. शिवाजी महाराज माझं दैवत! त्यांच्या चरणावर शंभर वेळा डोकं ठेवून माफी मागायला तयार: CM Eknath Shinde

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss