स्वातंत्र्यानंतर प्रथमच काँग्रेसला मिळणार मराठी पक्षाध्यक्ष? सोनिया गांधींनी घेणार मोठा निर्णय

मात्र काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदी मराठी नेता विराजमान होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

स्वातंत्र्यानंतर प्रथमच काँग्रेसला मिळणार मराठी पक्षाध्यक्ष? सोनिया गांधींनी घेणार मोठा निर्णय

देशात सध्या सगळीकडे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बोलबाला सुरु आहे. मात्र यामुळे काँग्रेस पक्ष चांगलाच अडचणीत आलेला आहे. भाजपाची वाढती लोकप्रियता आणि त्यांच्याकडे असलेली सत्ता यामुळे काँग्रेसचा देशाच्या अनेक कानाकोपऱ्यांवर असणारा प्रभाव आता कमी होत चालला आहे. त्यामुळे काँग्रेसमधील अनेक नेते हे आता काँग्रेसमधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. राहुल गांधींनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यापासून काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळालेला नाही. त्यामुळे आता काँग्रेसअध्यक्षपदाची निवडणूक लवकरच होणार असून ऑक्टोबरमध्ये काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदी मराठी नेता विराजमान होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार मुकूल वासनिक यांना मध्य प्रदेश काँग्रेस कमीटीच्या प्रभारी पदावरून मुक्त करून सोनिया गांधींनी त्यांच्या जागी जेपी अग्रवाल यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र त्यामुळे आता वासनिक काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत आल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद सोनिया गांधी यांच्याकडे आहे. मात्र आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांनीच अध्यक्षपद स्वीकारावं, अशी मागणी पक्षातून होत आहे. तर अशोक गेहलोत यांचं देखील नाव चर्चेत आहे. मात्र या दोघांनी नकार दिल्यास वासनिक यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. असं झाल्यास, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसच्या अध्यक्षपदी मराठी चेहरा विराजमान होऊ शकतो.

याआधी पृथ्वीराज चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र नव्या घडामोडींमुळे मुकूल वासनिक यांचे नाव पुढे आले आहे. वासनिक हे तीनवेळा खासदार राहिलेले आहे. तसेच सर्वात कमी वयात संसदेत पोहोचलेले खासदार अशी त्यांची ओळख आहे. काँग्रेसची सध्या भारत जोडो यात्रा सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ही यात्रा होत असून कन्याकुमारी ते काश्मीर अशी ही यात्रा असून ती १२ राज्यांमधून जाणार आहे. तसेच या यात्रेत राहुल गांधी साडेतीन हजार किमी प्रवास करणार आहेत. या यात्रेनंतरही अध्यक्षपदाचे समीकरण बदलू शकते. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता वाढली आहे.

हे ही वाचा:

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर प्रिन्स चार्ल्स ठरले ब्रिटनचे नवे राजा

औरंगाबादची युट्युबर बिंदास काव्या अखेर सापडली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version