spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

काँग्रेसला १९ ऑक्टोबरला मिळणार नवा अध्यक्ष

काँग्रेसमधे सध्या अध्यक्ष निवडणुकीचे वारे वाहत असून, पहिल्यांदाच गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती अध्यक्ष होणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी अनेक काँग्रेस नेते इच्छुक असून, यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) यांचे नाव चर्चेत आहे. अध्यक्षपदासाठी २४ ते ३० सप्टेंबर या काळात अर्ज भरण्यात येणार असून काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण हे १९ ऑक्टोबर रोजी स्पष्ट होणार आहे.

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीचे प्रमुख मधुसुदन मिस्त्री यांनी आज यासंबंधित नोटिफिकेशन जारी केलं आहे. या मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी २४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर रोजी अर्ज भरण्याची वेळ देण्यात आली आहे. त्यानंतर या अर्जांची पडताळणी करण्यात येईल. अर्ज मागे घेण्याची वेळ ८ ऑक्टोबर पर्यंत असेल. या काळात जर एकापेक्षा अधिक अर्ज उरले असतील तर अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबर रोजी निवडणूक घेण्यात येईल. या निवडणुकीचा निकाल १९ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. काँग्रेसची अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचं राहुल गांधी यांनी या आधीच जाहीर केलं आहे. त्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि खासदार शशी थरुर यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत असून हे दोन्ही नेते निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे.

Amazon great Indian Festival 2022: २३ सप्टेंबरपासून सुरू होणार अमेझॉनचा ग्रेट इंडियन सेल, जाणून घ्या मोबाइल एक्सचेंज ऑफर आणि बरंच काही…

काँग्रेस नेत्या आणि प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी या १९९८ पासून काँग्रेसच्या अध्यक्षपदावर आहेत. मधल्या दोन वर्षांच्या काळात म्हणजे २०१७ ते २०१९ या काळात राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची धुरा आली. नंतर पुन्हा एकदा सोनिया गांधी यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला गांधी घराण्याच्या बाहेरचा अध्यक्ष मिळणार हे आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे नवीन अध्यक्ष आता काँग्रेसला तारणार का हे येत्या काळात पाहावं लागेल.

हे ही वाचा:

झेप्टोचे सह-संस्थापक कैवल्य ठरले देशातील सर्वात तरुण श्रीमंत व्यक्ती

राजकारणातील हिंदुत्वाचा अर्थ सांगणारा चित्रपट ‘हिंदुत्व’चा ट्रेलर प्रदर्शित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss