Tuesday, July 2, 2024

Latest Posts

“मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला जावा हे काँग्रेसचे स्वप्न” डॉ. मनीषा कायंदे यांची खरमरीत टीका..

धान परिषद निवडणुकीपूर्वी उबाठा गटाचा बिल्डरांना ब्लॅकमेल करणे, त्यांच्यावर दबाव टाकून खंडणी वसूल करण्याचा त्यांचा उद्देश आहे का? महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब ठेवण्याचे काम कोणी केले होते? सचिन वाझे (Sachin Vaze) या पोलीस अधिकाऱ्याला हाताशी धरुन खंडणी वसुलीचे रॅकेट चालण्यात आले.

मुंबईतील नव्या इमारतींमध्ये मराठी माणसांना ५० टक्के आरक्षण मागणारे खासगी विधेयक सादर करण्यामागे उबाठा (UBT) गटाचा कयास हा बिल्डरांना ब्लॅकमेल करण्याचा आणि खंडणी वसुलीचा आहे.अशी खरमरीत टीका शिवसेना (Shivasena) सचिव प्रवक्त्या आमदार प्रा. डॉ. मनिषा कायंदे यांनी आज म्हणजे २५ जून २०२४ रोजी केली. लोकसभेत मराठी मतदारांनी ठेंगा दाखवल्यानेच उबाठाला मराठी माणसांचा पुळका आलाय, मात्र पदवीधर निवडणुकीत मतदार हे या भूलथापांना बळी पडणार नाहीत, असा विश्वास डॉ. मनीषा कायंदे (Dr. Manisha Kayande) यांनी व्यक्त केला आहे. 

मुंबईतील बाळासाहेब भवन (BALASAHEB THACKERAY KALADALAN) येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. मनिषा कायंदे यांनी अनिल परबांच्या ‘मराठी माणसांसाठी घरांचे आरक्षण‘ या खासगी विधेयकावर टीका केली. त्या म्हणाल्या की “वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी शिवसेनेची स्थापना केली. स्थानिय लोकाधिकार समितीची चळवळ उभी केली. त्यांचे हे महत्वपूर्ण विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच पुढे नेताना दिसत आहेत. त्यामुळेच एवढी मराठी मते ही त्यांच्याबाजूने निवडणुकीच्या वेळी उभी राहिली. मात्र उद्धव ठाकरे यांनी हिंदूत्व सोडले. त्यांच्याकडे २५ वर्ष मुंबई महापालिकेची सत्ता असताना यांनी मराठी माणसासाठी काय केले. यांच्यामुळे मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला” अशी टीका डॉ. कायंदे यांनी केली.

विधान परिषद निवडणुकीपूर्वी उबाठा गटाचा बिल्डरांना ब्लॅकमेल करणे, त्यांच्यावर दबाव टाकून खंडणी वसूल करण्याचा त्यांचा उद्देश आहे का? महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब ठेवण्याचे काम कोणी केले होते? सचिन वाझे (Sachin Vaze) या पोलीस अधिकाऱ्याला हाताशी धरुन खंडणी वसुलीचे रॅकेट चालण्यात आले. मविआ सरकारच्या काळात मातोश्री-२ झाले तेव्हा यांना मराठी माणसांची आठवण नाही आली. पत्रा चाळ पुनर्विकासात मोठा आर्थिक घोटाळा करुन शेकडो मराठी कुटुंबांना रस्त्यावर आणणारे जनतेला माहित आहेत.” त्या पुढे म्हणाल्या की “अनिल परब (Anil Parab) कायद्याचे अभ्यासक आहेत. कोणत्या कायद्याखाली मराठी माणसाला ५० टक्के घरे राखीव ठेवणार, याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यायला हवे.

मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला जावा हे काँग्रेसचे स्वप्न आहे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी उबाठा काँग्रेसचा अजेंडा राबवत आहेत. धारावीत ३० ते ३५ टक्के मराठी कुटुंब राहतात. धारावीचा प्रोजेक्ट कसा थांबेल यासाठी त्यावेळी काँग्रेसच्या स्थानिक आमदारांनी प्रयत्न केले. याउलट महायुती सरकारकडून मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देण्यात आली आहे. या पुनर्विकासात मराठी माणसांना १०० टक्के घरे देण्यास सरकार कटिबद्ध आहे. असे आवाहन तेव्हा केले गेले होते आणि ते धोरण त्यांनी अमलात आणलेले आपण पाहूच शकतो. मराठी माणूस टिकून राहावा म्हणून ठाण्यात क्लस्टर डेव्हलपमेंटसारखे प्रोजेक्ट राज्य सरकार वेगाने राबवत आहे आणि यासारखे अनेक प्रकल्प मराठी माणूस व त्याच्या परिवारासाठी हे सरकार पुढे राबवणार आहे.” असे डॉ. मनीषा कायंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपले मंतव्य मांडले.

यातून त्यांनी सरकारची पुढील धोरणे काय असतील या संदर्भाची माहिती दिली. सोबतच त्यांनी विरोधीपक्षावर घणाघाती टीका केल्या आहेत. आता केवळ विधान परिषद निवडणुकीत कोण बाजी मारेल हे पाहून विशेष औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या विधान परिषद निवडणुकांकडे लागून राहिले आहे. 

हे ही वाचा

VIDHAN PARISHAD ELECTION 2024: कोण ठरणार मुंबई शिक्षक मतदार संघाचे उमेदवार ?

VIDHAN PARISHAD ELECTION: मुंबई पदवीधर मतदारसंघ कोणाच्या ताब्यात येणार ? ; जाणूयात सविस्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss