spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

समृध्दी महामार्गाशी ऑरिक सिटीला जोडल्यास गुंवणूकीत नक्कीच वाढ होणार; उद्योगमंत्री

काही दिवसांपासून समृद्धी महामार्गाचा काम जोरात सुरु असलायचं दिसत आहे. समृध्दी महामार्गाशी (Samruddhi Highway) ऑरिक सिटीला जोडल्यास गुंवणूकीत नक्कीच वाढ होणार. तर ऑरिक सिटीच्या जवळून जाणाऱ्या समृध्दी महामार्गाशी ऑरिक सिटीला जोडल्यास गुंवणूकीत नक्कीच वाढ होणार असल्याने संबंधित यंत्रणांनी तातडीने हे काम पूर्ण करण्याचे निर्देश उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिले. ऑरिक सिटीला उद्योगमंत्र्यांनी शुक्रवारी भेट देऊन येथील उद्योजक तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला.

माध्यमांशी संवाद साधतांना उदय सामंत यांनी सांगितले की, ऑरिक सिटीपासून केवळ ९०० मीटरवरून जाणाऱ्या समृध्दी महामार्गाला ऑरिक सिटी जोडल्यास नक्कीच फायदा होणार आहे. यामुळे मुंबई आणि पुण्याशी कनेक्टीव्हीटी वाढून वेळेची बचत होणार असल्याने उद्योजक मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतील. उद्योग वाढीसाठी काही नवीन योजना सुरू करता येतील का? याचाही विचार करण्यात येत आहे. ऑरिक सिटीमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्याचे नियोजन करावे, ट्रक टर्मिनल उभारावे, रहिवाशी वसाहतींमधील समस्या जाणून घ्याव्यात आणि त्या सोडविण्यासाठी देखील प्रयत्न करण्याचे निर्देश उद्योगमंत्र्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

तर यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, उद्योजक आणि अधिकारी यांच्यामध्ये समन्वय ठेवावा. इतर काही समस्या असल्यास तसा प्रस्ताव पाठवावा आणि त्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्यात येईल. तसेच जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासाठी दिवाळीतनंतर मुंबईत बैठक घेणार असल्याचेही उद्योगमंत्र्यांनी सांगितले. पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी पैठण एमआयडीसीतील समस्या उद्योगमंत्र्यांना सांगितल्या. गेवराई तांडा ते वाळुज रस्ता बनविल्यास या क्षेत्रातील उद्योगांना भरारी मिळणार असल्याने यावर तातडीने करावी, उद्योगांमध्ये स्थानिकांना नोकरी द्यावी तसेच सीएसआर हा जिल्ह्यातील विकास कामांसाठी खर्च करण्यासाठी उद्योजकांना सूचित करण्याची विनंती देखील भुमरे यांनी उद्योगमंत्र्यांना केली.

हे ही वाचा :

मध्यप्रदेशमध्ये भीषण अपघात; घाटात बस उलटली, १४ जणांचा मृत्यू

राशी भविष्य – २२ ऑक्टोबर २०२२ – आजचा दिवस धनलाभाचा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss