वादग्रस्त वक्तव्यानंतर रामदेव बाबांचा माफीनामा

वादग्रस्त वक्तव्यानंतर रामदेव बाबांचा माफीनामा

काही दिवसांपूर्वी रामदेव बाबा यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर बाबा रामदेव यांनी महिलांसंबंधी वक्तव्यावर माफी मागितली आहे. राज्य महिला आयोगाने त्यांच्या विधानाची गंभीर दखल घेत रामदेव बाबांना दोन दिवसात खुलासा करण्याची नोटीस पाठवली होती. आपल्या शब्दांनी ठेच लागली असल्यास माफी मागतो, अशा भावना रामदेव बाबांनी व्यक्त केल्या आहेत.

बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांनी ठाणे येथील एका सार्वजानिक कार्यक्रमात महिलांसंबंधी वादग्रस्त विधान केले होते. या वक्तव्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली. याबाबतीत दोन दिवसाच्या आत आपला खुलासा सादर करण्यासाठी नोटीस त्यांना पाठवण्यात आली होती. रामदेव बाबांनी ईमेलद्वारे खुलासा करत वक्तव्याबाबत माफी मागितली आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम १९९३ नुसार मी कुठलाही अपराध केलेला नाही. मी जागतिक स्तरावर महिला सबलीकरणासाठी काम करत आलो आहे. जेणेकरुन महिलांना समाजात समानतेचा दर्जा प्राप्त होण्यास मदत होईल. भारत सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ सारख्या योजनांना प्रोत्साहन दिलंय. इतकंच नाही तर महिलांचं समाजातील स्थान मजबूत करण्यासाठी विविध संघटनांच्या साथीने कामही केलंय.

महिलांचा अपमान करण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता. महाराष्ट्रातील ठाण्यात आयोजित कार्यक्रम महिला सशक्तीकरणासाठी होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्लीपमधून माझ्या शब्दांना चुकीचा अर्थ देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मी आई आणि मातृशक्तीचा नेहमीच गौरव केला आहे. मी एक तासाच्या लेक्चरमध्ये वस्त्रांसंबंधी जे वक्तव्य केलं, त्याचा अर्थ माझ्याप्रमाणे वस्त्रांप्रमाणे साधी वस्त्रं असा होता. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी खेद व्यक्त करतो. माझ्या शब्दांनी ज्यांना वाईट वाटलं त्यांची मी निरपेक्ष भावनेने क्षमा मागतो, असं रामदेव बाबा म्हणाले.

हे ही वाचा : 

Bigg Boss Marathi 4 : राखी सावंतच्या वाईल्ड कार्ड एंट्रीवर घरात खळबळीचं वातावरण

Jhalak Dikhhla Jaa winner 2022 गुंजन सिन्हा-तेजस वर्मा ‘झलक दिखला जा १०’च्या ट्रॉफीचे ठरले मानकरी, ‘इतक्या’ रकमेचे मिळाले बक्षिसे

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version