spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नाना पाटोले यांचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य

सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक नेत्यानंकडून महाराष्ट्राचं (Maharashtra) आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य (Controversial statement) करत आहेत. आज काँग्रेसचे नेते आणि प्रदेश अध्यक्ष (State President) नाना पाटोले (Nana Patole) यांनी छत्रपती शिवाजी महाराजां बदल वादग्रस्त वक्तव्य केला आहे. कुणबी समाजाने (Kunbi community) खऱ्या अर्थाने राज्याला नेतृत्व दिले. छत्रपती शिवाजी महाराज हे कुणबी समाजाचे होते, त्यांनी नेतृत्व व राज्य कसे असावे, याची दिशा राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला दिली. महाराजांच्या पावलावर पाऊल ठेऊन आपण कार्य करीत आहोत, असे पटोले म्हणाले. अकोल्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असतांना त्यांनी प्रसारमाध्यमांशी (media) संवाद साधला. नानांनी शिवरायांबाबत केलेल्या या विधानामुळे आता नवा वाद उसळण्याची शक्यता आहे.

नाना पाटोले अकोल्यात (Akola) एका कार्यक्रमानिमित्त आले असतांना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. लोकशाहीमध्ये प्रत्येक समाजाला आपले नेतृत्व मोठे व्हावे, असे अपेक्षित असते. समाजाचे नेतृत्व राहावे, ही काळाची गरज आहे. कुणबी हा अन्नदाता समाज आहे. देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या (suicide) मोठ्या प्रमाणात होत आहे. आत्महत्या करू नका, ज्या व्यवस्थेकडून आत्महत्या करायला बाध्य केले जात आहे, त्यांना आत्महत्या करायला लावा, असे आवाहन पटोले यांनी केले. कुणबी समाजात माझ्यापेक्षाही अनेक मोठे नेते आहेत. प्रत्येकाला समाजाचे देणे लागते. समाजासाठी सातत्याने कार्य करण्याची जबाबदारी प्रत्येकाची असते. त्यानुसार मी कार्य करीत असल्याचे पटोले यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या दौऱ्यावरही नाना पटोले यांनी पुन्हा एकदा जोरदार टीका केली. मोदींच्या दौऱ्यामुळे कुठलाच फायदा झाला नाही, उलट निराशा झाली. जनतेला वेठीस धरण्यात आले. समृद्धी महामार्गामुळे (Samruddhi Mahamarg) फक्त काही नेते व अधिकाऱ्यांचीच समृद्धी झाली. लवकरच त्याचे पुरावे बाहेर काढू, असा इशारा पटोले यांनी दिला. भाजपला सत्तेची गुर्मी आल्याची टीकाही त्यांनी केली.

हे ही वाचा : 

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडेंनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद

Elton John चुकीची माहिती या कारणास्तव संगीतकार एल्टन जॉन यांनी घेतला ट्विटरसंबधी मोठा निर्णय

अनिल देशमुखांच्या जामिनाला १० दिवसांची स्थगिती

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss