spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कामात- जेठमलानीच्या वादात आयोगाची मध्यस्थी

आज दुपारी ४ वाजल्यापासून निवडणुकीच्या सुनावणीला सुरवात झाली आहे. आणि या युक्तिवादामध्ये कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी जोरदार युक्ती वाद सुरु केला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाची राष्ट्रीय कार्यकारणी बेकायदेशीर असल्याच त्यांनी सांगितलं.तर देवदत्त कामात (Devdutt Kamat) यांनी सुद्धा जोरदार युक्ती वाद केला. पक्षप्रमुख पदाची मुदत संपण्याधी परवानगी द्या. तर एकनाथ शिंदे यांचा गट राजकीय पक्ष नाही. शिंदे गटाच्या तुलनेत आमच्याकडे संघटनात्मक संख्याबळ जास्त आहे, असं देवदत्त कामात यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. तर एकनाथ शिंदे यांचं मुख्य नेते पद बेकायदेशीर आहे. मुख्य नेतेपद हे शिवसेनेत नाही. तर सादिक अली केस (Sadiq Ali Case) इथे लागू होत नाही असं सुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

पक्षाची घटना सर्वाच्च आहे. आमदार पक्षाच्या एबी फॉर्ममधून (AB form) निवडून आले, नंतर नियम का लागू नाही? असा प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी देवदत्त कामात यांनी उपस्थित केला आहे. तर प्रतिनिधी सभा फक्त तुमच्या कडेच कशी ? असा प्रश्न शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांच्याकडून देवदत्त कामात यांना विचारण्यात आला. या वेळी दोन्ही वकिलांमध्ये वाद दिसून आला. त्या वादामध्ये आयगोने मध्यस्थी केली आणि वाद सोडवला आहे. शिंदे गटाला कोणताही अधिकार न देता सभा घेण्यास परवानगी द्या. तर प्रतिनिधी सभा अंतिम निर्णय घेऊ शकते असं सुद्धा त्यांनी सांगितलं.

ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगामध्ये २ अर्ज दाखल करण्यात आलं आहे. प्रतिनिधी सभा आणि नेता निवडीसाठी ठाकरे गटाचा अर्ज आहे. तर पक्षप्रमुखांची निवड राष्ट्रीय कार्यकारणीत होऊ शकते असं सुद्धा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

हे ही वाचा:

Swiggy ने घेतला मोठा निर्णय, ३८० कर्मचाऱ्यांना कामावरून टाकणार काढून

IND vs NZ दुसऱ्या वनडेपूर्वी टीम इंडियासाठी वाईट बातमी, बीसीसीआयने केली मोठी कारवाई

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss