संजय राऊत आणि नारायण राणे यांच्या वादात वाढ, राऊतांनी पाठवली मानहानीची नोटीस

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party leader Sanjay Raut) आणि भारतीय जनता पार्टीचे नेते नारायण राणे (Narayan Rane) यांच्या वादात आता दिवसेंदिवस वाढ हि होऊ लागली आहे.

संजय राऊत आणि नारायण राणे यांच्या वादात वाढ, राऊतांनी पाठवली मानहानीची नोटीस

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party leader Sanjay Raut) आणि भारतीय जनता पार्टीचे नेते नारायण राणे (Narayan Rane) यांच्या वादात आता दिवसेंदिवस वाढ हि होऊ लागली आहे. त्याच्या वादात आता इतकी वाढ झाली आहे की, राजकीय आरोप – प्रत्यारोप असणारे हे प्रकरण न्यायालयात जाणार आहे. कारण खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. यामुळे आता राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.

भारतीय जनता पार्टीचे नेते नारायण राणे यांनी दि. १५ जानेवारी रोजी एक वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरुन संजय राऊत यांनी ही नोटीस पाठवली आहे. राणेंनी सार्वजनिक मंचावरुन खोटे आरोप केले आहेत आणि म्हणून संजय राऊत यांनी आरोप केला आहे.तसेच या संदर्भात संजय राऊत यांनी स्वतः एक ट्विट देखील केले आहेत. या ट्विट मध्ये संजय राऊत म्हणाले आहेत की, नारायण राणे सार्वजनिक मंचावरून तसेच माध्यमातून माझ्याविषयी आणि शिवसेने बाबत बिनबुडाचे आरोप करीत असतात.हे आरोप त्यांनी सिध्द करावेत. अन्यथा माफी मागावी.माझे वकील सार्थक शेट्टी यांच्या मार्फत मी त्यांना कायदेशीर कारवाई बाबत नोटीस बजावली आहे. कर नाही तर डर कशाला? जय महाराष्ट्र!

माणसाने भाजपच्या नादाला लागून किती खोटे बोलावे याला ही काही मर्यादा आहेत. नारायण राणेंनी सतत माझ्याविषयी काही वक्तव्य केली आहेत. त्यामुळे मी त्यांना कोर्टाची नोटीस पाठवली आहे. नारायण राणेंनी या नोटिसीनंतर माफी मागितली नाही तर न्यायालयात त्यांच्यावर खटला दाखल करेन. किरीट सोमय्यांवर देखील मी खटला दाखल करणार आहे. फक्त मीच नाही तर शिवसेनेच्या ज्या नेत्यांवर अशाप्रकारचे आरोप होत आहेत ते सर्व नेते खटले दाखल करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे

तसेच संजय राऊत पुढे म्हणाले, नारायण राणे सार्वजनिक मंचावरुन तसेच माध्यमातून संजय राऊत आणि शिवसेनेबाबत बिनबुडाचे आरोप करत असतात. हे आरोप त्यांनी सिद्ध करावेत. अन्यथा माफी मागावी. माझे वकील सार्थक शेट्टी यांच्यामार्फत मी त्यांना कायदेशीर कारवाई बाबत नोटीस बजावली आहे. यामाध्यमातून संजय राऊत यांनी नारायण राणेंवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. पुढे राऊत म्हणाले, नारायण राणे म्हणतात २००४ साली त्यांनी मला खासदार केले. माझी नेमणूक करण्यासाठी नारायण राणे हे शिवसेना प्रमुख होते का? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यावेळी काय करत होते? आता नारायण राणेंनी बाळासाहेबांची शिवसेनाप्रमुख म्हणून मीच निवड केली हे सांगणे बाकी आहे. नारायण राणे काहीही वक्तव्य करु शकतात असं म्हणत राऊतांनी राणेंना चिमटा काढला आहे.

हे ही वाचा:

Shubhangi Patil यांची पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया, झाशीची राणी लढली तसं मला लढायचं

Amul Milk Price Hike, सर्वसामान्यांना मोठा धक्का, अमूल दुधाच्या दरात करण्यात आली ‘इतकी’ वाढ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version