spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिंदे गटात वाद :आमदाराने साधला आपल्याच मंत्र्यावर निशाणा

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या जवळपास ४० आमदारांनी बंडखोरी केल्याने राज्यातील राजकारणात उलथापालथ झाली. या उलथापालथमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदारांनी महत्त्वाची भूमिक निभावली होती. पण हे सरकार स्थापन होऊन तीन महिने होत असताना शिंदे गटातीलच आमदारांमध्ये वाद सुरु असल्याचं चित्र समोर येत आहे. विशेष म्हणजे शिंदे गटातील आमदार आपल्याच गटाच्या मंत्र्यावर प्रसारमाध्यमांसमोर येऊन टीका करताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी पुढे काय वाढून ठेवलंय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांनी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘मंत्री झालात म्हणजे सरकार काही तुमची खासगी मालमत्ता नाही’, असे म्हणत चिमणरावांनी गुलाबराव पाटील यांना सुनावलं आहे. चिमणराव पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका केली. गुलाबराव पाटील यांनी राजकारणातील शुद्रपणा करु नये, असं देखील चिमणराव पाटील म्हणाले. त्यांच्या या टीकेनंतर शिंदे गटात सारं काही आलबेल आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होतोय. विशेष म्हणजे खान्देशातील शिंदे गटाच्या या दोन बड्या नेत्यांमध्ये सुरु असलेल्या संघर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकी काय प्रतिक्रिया देतात? हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. याशिवाय या दोन नेत्यांमधील संघर्षाला लगाम लावण्यास मुख्यमंत्र्यांना यश येतं का? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल.

चिमणराव पाटील प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले “तो राजकारणातला शुद्रपणा आहे. असं करु नये. सरकारमध्ये आपण काम करतो तेव्हा ते सरकार बनवण्यामध्ये प्रत्येकाचा वाटा असतो. प्रत्येकाचं योगदान असतं. एक-एक मतावर सरकार येतं आणि कोसळतं, दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारसारखं! त्यामुळे मंत्री झालं म्हणजे सरकार खासगी मालमत्ता नसते. सर्व मिळून सरकार आलेलं असतं. सरकार आल्यामुळे तुम्ही मंत्री आहात. याचं भान तुम्ही कायम ठेवलं पाहिजे”,अशाप्रकारे माध्यमांसमोर गुलाबरावांवर टीका केल्याने त्यांच्यातील संघर्ष ठळकपणे जगजाहीर झालाय.

 

हे ही वाचा:

नवनीत राणांवर अजामीनपात्र वॉरंट जारी! बोगस जातपडताळणी राणांना पडणार भारी

शेतकऱ्यांकडं ना झाडी, ना हॉटेल, ना ५० खोके; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

प्राणीप्रेमी सावधान !भटक्या कुत्र्यांवर कारवाईचे निर्देश,कारवाईत अडथळा आणल्यास अटक केली जाईल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss