कोरोनाच्या नियमांचे केले उल्लंघन; उध्दव ठाकरेंवर केली तक्रार

उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झालीय तर ते जनतेला कसे भेटू शकतात. ? उध्दव ठाकरे यांच्यावर मुंबईत पोलिस तक्रार देखील केली आहे.

कोरोनाच्या नियमांचे केले उल्लंघन; उध्दव ठाकरेंवर केली तक्रार
सलग दोन दिवसात एकनाथ शिंदेवरून  राज्यात कसा घोळ झाला याच्या अनेक घटना तसेच फोटोज पाहायला मिळाले. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेनं भाजपासोबत येऊन सरकार स्थापन करावं अशी मागणी केली
त्यामुळे महाराष्ट्रच्या राजकारणात पुढे कोणत्या घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सकाळी राज्यपालांना कोरोनाची लागण झाली त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील कोरोना ची लागण झाली आहे. जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे फेसबुक लाइव्ह येऊन जनतेशी संवाद साधला.
मी आव्हानांना सामोरे जाणारा माणूस आहे मी खचून जाणार नाही. मी शिवसेना पक्ष प्रमुख सोडायला तयार आहे आणि माझ्या राजीनाम्याचं पत्र देखील तयार आहे मी लाचार किंवा मजबूर नाही. पण बंडखोर आमदारांनी समोर यावं. सर्व आमदार माझ्या कुटुंबातील सदस्यांसारखेच आहेत. तुम्ही मला जे प्रेम दिलात ते पूढेही असंच ठेवा. असं म्हणत त्यांनी जनतेशी संवाद साधला. त्यानंतर उध्दव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडून त्यांच्या मूळ घरी म्हणजेच मातोश्री बंगल्यावर पुन्हा गेले. मातोश्री बंगल्यावर जाताना अनेक शिवसैनिकांनी रस्त्यावर गर्दी केली होती. आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा घोषणा देखील ते करत होते.
अनेक शिवसैनिकांना पाहून उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांसोबत जवळ येऊन त्यांना भेटले. ह्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत ठरले आहेत. उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झालीय तर ते जनतेला कसे भेटू शकतात. असा सवाल भाजप युवामोर्चाचे राष्ट्रीय सचिव तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी केला असून त्यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर मुंबईत पोलिस तक्रार देखील केली आहे.
Exit mobile version