spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राज्यातील सत्तासंघर्षाचे प्रकरण आता घटनापीठाकडे, पुढील सुनावणी २५ ऑगस्टला

शिवसेनेत बंड करत एकनाथ शिंदेसह आमदार बाहेर पडले, त्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. हा राजकीय भूकंप झाल्यानंतर शिवसेना आमचीच असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला, शिंदे गटाचा हा दावा खोडून काढण्यासाठी शिवसेनेन शिंदे गटाविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केल्या. यापूर्वी या प्रकरणावर शेवटची सुनावणी ४ ऑगस्टला पार पडली होती. त्यानंतर १२ ऑगस्ट आणि २२ अशी दोनदा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. काल त्रिसदस्यीय खंडपीठातील एक न्यायाधीश उपलब्ध नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती.

भारतातील पहिल्या महिला भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ ॲना मणी यांची १०४ वी जयंती

आता सत्तासंघर्षाचं प्रकरण अखेर घटनापीठाकडे वर्ग करण्यात आले आहे. हे प्रकरण आता ५ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणातील निकाल लंबणीवर गेले आहे. पुढील सुनावणी आता गुरुवारी म्हणजेच २५ ऑगस्टला होणार आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या सुनावणीला देखील न्यायालयाकडून दोन दिवसांची स्थगिती देण्यातआली आहे.

मात्र आज या याचिकांवर सुनावणी होणार असल्याचे सांगितले जात होते. शिवसेनेच्या याचिकांवर आजच सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट झाले होती. 3 जणांच्या खंडपीठासमोर राज्याच्या संत्तासंघर्षाची सुनावणी होणार होती.  मुख्यन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा, कृष्ण मुरारी आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठापुढे आज याचिकांवर सुनावणी होणार असे म्हटले जात होते.

हेही वाचा : 

टिकटॉक स्टार असलेल्या भाजप नेत्या सोनाली फोगट यांचे निधन

Latest Posts

Don't Miss