Anil Deshmukh अनिल देशमुख यांना कोर्टाचा दिलासा, जामीन मंजूर

Anil Deshmukh अनिल देशमुख यांना कोर्टाचा दिलासा, जामीन मंजूर

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा एक लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. आठवड्यातून दोन दिवस देशमुख यांना ईडी कार्यालयात हजेरी लावणं गरजेचं असणार आहे. १३ महिन्यानंतर अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर येणार आहेत.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा एक लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. आठवड्यातून दोन दिवस देशमुख यांना ईडी कार्यालयात हजेरी लावणं गरजेचं असणार आहे. १३ महिन्यानंतर अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर येणार आहेत.१०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणार अनिल देशमुख यांच्यावर आरोप आहे. ईडीने अनिल देशमुखांना अटक केली होती. ईडी प्रकरणी अनिल देशमुख यांना आधी जामीन मंजूर मिळाला आहे. आता सीबीआय प्रकरणातही अनिल देशमुख मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या जामीनावर सुनावणी झाली. न्यायाधीश एम.एस कर्णिक यांच्या खंडपीठापुढे त्यांच्या जामीन अर्जावर युक्तिवाद झाला आणि अखेर देशमुखांना जामीन मंजूर झाला आहे.

चंद्रकांत पाटलांवर शाईफेक झाल्यानंतर, स्थानिक पोलिसांसह क्राईम ब्रान्च देणार अधिकची सुरक्षा

अनिल देशमुख यांच्यावर जसलोक रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरु आहेत. ईडीकडून (ED) जामीन मिळाल्यानंतरही अनिल देशमुख यांची तुरुंगातून सुटका होऊ शकली नव्हती. सीबीआय प्रकरणातील गुन्ह्यांमुळे अनिल देशमुख यांनी पुन्हा कोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता. आता ईडीनंतर अनिल देशमुख यांना सीबीआय प्रकरणातील दिलासा मिळाला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांना जामीन दिल्याच्या निर्णयाला सीबीआयने (CBI) आव्हान दिलं आहे. सीबीआय आता या विषयी पुढे दाद मागणार आहे. त्यामुळे त्यांच्या सुटकेसाठी आता १० दिवसांची प्रतिक्षा करावी लागणार आहे. जामीनाचा आदेश स्थगित करावा, अशी मागणी सीबीआयने केल्याची माहिती देशमुखांचे वकील अनिकेत कदम यांनी दिली आहे.

हेही वाचा : 

Cyclone Mandous मंदोस चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रालाही बसला, सिंधुदुर्गात अवकाळी पावसामुळे आंबा, काजू बागायतदारांची वाढली चिंता

Exit mobile version