spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

रवी राणांवरील टीका महागात, बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल

आमदार रवी राणा यांच्या आरोपांमुळे राजकीय कोंडीत सापडलेले आमदार बच्चू कडू यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. बच्चू कडू यांनी अलीकडेच रवी राणा यांना प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती. याप्रकरणी बच्चू कडू यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय दंडसंविधानातील कलम ५०१ अंतर्गत बच्चू कडू यांच्यावर अब्रनुकसानीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आता पोलीस याप्रकरणात पुढे काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

बच्चू कडू यांनी गुवाहटीला जाऊन पैसे घेतले असा आरोप रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केला होता. त्यानंतर राणा यांनी याबाबतचे पुरावे द्यावे असे आवाहन बच्चू कडू यांनी केलं होतं. त्यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी महिलांबाबत तसेच तृतीय पंथियांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले आहे, असा आरोप महिला मुक्ती मोर्चाकडून करण्यात आला आहे. बच्चू कडू यांच्या या वक्तव्यामुळे समस्त महिला वर्गाचा अपमान करण्यात आल्याचा आरोप देखील महिला मुक्ती संघटनेने केलाय. त्यामुळेच महिला मुक्ती मोर्चाने बच्चू कडू यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

“रवी राणा जर एका बापाची औलाद” असतील तर त्यांनी मी पैसे घेतल्याचे पुरावे द्यावे अन्यथा आम्ही त्यांना ‘हिजडा’ म्हणून घोषित करू, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं होतं. याबरोबरच राणा यांनी पुरावे दिले तर त्यांच्या घरची भांडी घासू असंही बच्चू कडू म्हणाले होते. बच्चू कडू यांच्या याच वक्तव्याविरोधात महिला मुक्ती मोर्चा संघटनेने तक्रार दिली आहे.

रवी राणा यांनी गुरुवारी एक ट्विट करुन बच्चू कडू यांना अप्रत्यक्षपणे डिवचले होते. दिवा जेव्हा विझतो तेव्हा तो फडफड करतो, त्यातला ‘हा’ एक दिवा आहे, दिवाळीत खूप फटाके फुटले त्यातला ‘हा’ फुसका फटाका आहे, असे रवी राणा यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. या टीकेला बच्चू कडू यांनीही प्रत्युत्तर दिले होते. माझा इशारा हा फुसका बार आहे की बॅाम्ब आहे, हे १ तारखेला दाखवू. हा बॉम्ब कसा कुणाच्या खाली लावायचा हे बच्चू कडूला चांगलं माहीत आहे. बॉम्ब कसा आहे हे १ तारखेला कळेल, असे बच्चू कडू यांनी म्हटले.

हे ही वाचा :

शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात युवा काँग्रेस आक्रमक; ३१ ऑक्टोबरला राज्यव्यापी आंदोलन

हे फायनल करा; नारायण राणेंचा फोटो लावला २५ पैशांच्या नाण्यावर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss