spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘सामना’च्या ‘रोखठोक’मधून मुख्यमंत्री शिंदेंवर घणाघात, दिवंगत आनंद दिघे यांच्या नावाचा गैरवापर केल्याचा आरोप

राज्यातील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन केली. मात्र, हा बंड शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मान्य नसल्याने शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. आता, शिवसेना विरुद्ध शिवसेना असाच सामना राज्यात रंगात असलयाचे पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानतंर आता कायदेशीरपणे शिवसेना पक्षावर ताबा मिळवण्याची तयारी सुरु केली आहे. तर, शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावाही आमचाच असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचं नाव घेऊन सध्या शिंदे गटाचं राजकारण सुरू आहे. आता, शिवसेनेनं रोखठोकमधून एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.

सामानाच्या रोखठोकमध्ये नेमकं काय म्हटले आहे?

“शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे कवित्व सुरू आहे. शिवतीर्थावरचा मेळावाच खरा हे देश जाणतो. पण शिंदे गट त्यांचीच शिवसेना खरी असे मानून दुसरा मेळावा घेत आहे. या क्षणी दिल्लीस आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. पुन्हा आनंद दिघे यांच्या नावाने हे खेळ सुरू आहेत. राजकारणात सगळ्यांनाच ‘दिघे’ होता येत नाही. काही जण ‘शिंदे’ होतात”, असा घणाघात ‘रोखठोक’ या सदरातून करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

गांधी जयंतीनिमित्त पीएम मोदींसह सोनिया गांधींही पोहचल्या राजघाटावर, बड्या नेत्यांकडून राष्ट्रपिता यांना भावपूर्ण श्रद्धांजली

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे कवित्व सुरू आहे. शिवतीर्थावरचा मेळावाच खरा हे देश जाणतो, पण शिंदे गट त्यांचीच शिवसेना खरी असे मानून दुसरा मेळावा घेत आहे. या क्षणी दिल्लीस आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. पुन्हा आनंद दिघे यांच्या नावाने हे खेळ सुरू आहेत. राजकारणात सगळ्यांनाच ‘दिघे’ होता येत नाही. काही जण ‘शिंदे’ होतात… दिघे नक्की कोण होते? त्यावर प्रकाशझोत टाकणारे खळबळजनक रोखठोक, असे म्हणत सामनाच्या रोखठोकमधून शिंदेंना टोला लगावण्यात आला आहे.

“महाराष्ट्रात उभी फूट पाडण्यासाठी शिंदे यांनी आज हयात नसलेल्या स्व. आनंद दिघे यांचा आधार घेतला. दिघे यांची आठवण शिंदे यांना २१ वर्षांनंतर झाली. दिघे यांच्या आपण किती निकट होतो हे दाखविण्यासाठी शिंदे यांनी काही कोटी खर्च करून ‘धर्मवीर’ सिनेमा काढला. सिनेमावर खर्च झाला त्यापेक्षा जास्त खर्च सिनेमाच्या म्हणजे स्वतःच्या प्रसिद्धीवर केला. हा सिनेमा आनंद दिघे यांच्यावर होता की शिंद्यांवर, असा प्रश्न हा सिनेमा पाहून अनेकांना पडला. कारण या सिनेमाचे प्रयोग सुरू असतानाच शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या पाठीत खंजीर खुपसला व शिवसेना फोडली. शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून टीव्हीवर या सिनेमाचा भडीमार सुरू आहे, तो फक्त शिंदे यांच्या प्रसिद्धीसाठी. या चित्रपटाद्वारे दिघे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे हेच एक अद्भुत व्यक्तिमत्त्व असल्याचे दाखविण्यात आले आहे” अशा प्रकारे रोखठोक मधून धर्मवीर या चित्रपटावर देखील टीका केली आहे.

आज महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त जाणून घेऊया समाजावर आपली छाप सोडणाऱ्या या नेत्यांबाबत

सण-उत्सवांच्या मोसमात महाराष्ट्राचे वातावरण आणि राजकारण कमालीचे गढूळ झाले आहे. शिवसेनेत मोठी फूट पाडून एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. इथपर्यंत ठीक, पण त्यांनी सरळ शिवसेनेवरच दावा सांगितला. हे डोके शिंदे यांचे नाही. त्यामागे भारतीय जनता पक्षाचे मोठे कारस्थान आहे. छगन भुजबळ, नारायण राणे व राज ठाकरे यांनी बंड केले किंवा पक्ष सोडला. पण शिवसेनेवरच दावा सांगण्याचा उद्दामपणा यापैकी कोणीच केला नव्हता. हा उद्दामपणा भाजपच्या पाठिंब्यातून निर्माण झाला”, असा आरोपही ‘रोखठोक’मधून करण्यात आला आहे.

Pune Chandani Bridge : अखेर चांदणी चौकातील पुल जमीनदोस्त पण, वाहतूक अजूनही बंदच

Latest Posts

Don't Miss