दादा हा ‘शो’ नाही, पहाटेच्या फ्लॉप ‘शो’सारखा हा ‘शो’ले आहे, म्हणत श्रीकांत शिंदेंनी अजित पवारांवर केला पलटवार

एव्हरग्रीन ब्लॉकबस्टरसारखा आहे आणि हो…हिंदुत्वाचे तेज आणि

दादा हा ‘शो’ नाही, पहाटेच्या फ्लॉप ‘शो’सारखा हा ‘शो’ले आहे, म्हणत श्रीकांत शिंदेंनी अजित पवारांवर केला पलटवार

हल्लीच्या काळात महाराष्ट्रातील सत्तानाट्य दिवसेंदिवस वेगवेगळी वळणं घेत आहे. तसेच हल्लीच्या काळात सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर आणि विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर केलेल्या टीका सतत आपल्या कानावर येत असतात आंणि सध्या तरी शिवसेना विरुद्ध शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिंदे गट असे वाद सतत सुरु असतात आणि आता त्यात अजून भर म्ह्णून अलीकडेच अजित पवारांनी एकनाथ शिंदेंच्या कामकाजावर निशाणा साधत त्याच्या जोरदार टीका केली होती आणि आता याच टिकेमुले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे (Dr Shrikant Eknath Shinde) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार ( ajit pawar) यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. अजित पवारांनी एकनाथ शिंदेंवर टीका केल्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी आपल्या स्टाईलमध्ये पहिल्यांदाच या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

खासदार श्रीकांत शिंदे यांनी ट्वीट करून अजितदादांना टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. दादा हा ‘शो’ नाही, पहाटेच्या फ्लॉप ‘शो’सारखा हा ‘शो’ले आहे , एव्हरग्रीन ब्लॉकबस्टरसारखा आहे आणि हो…हिंदुत्वाचे तेज आणि विकासकामांच्या ‘ट्रेलर’नेच धडकी भरली ? पिक्चर अभी बाकी है’, असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी अजितदादांना प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांची शो मॅन राज कपूर यांच्याशी तुलना केली होती.’गणपतीच्या दर्शनाला आम्हीही जातो. पण कधी कॅमेरमॅन घेऊन जात नाही. पण, आता असे कॅमेरे लावले जातात, बरोबर गाडी थांबते, बरोबर कुणी तरी उतरलो, मग एंट्री होते. कशाला या सगळ्या गोष्टी पाहिजे. तुमचं तुमच्याकडे ठेवा. गणेशभक्तांनी देखावे ठेवायचे असतात. आता काय तर शो करायची सवय लागली आहे. राज कपूर हे शोमॅन होते, तशी सवय काही लोकांना लागली आहे.’

हे ही वाचा:

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यामुळे वाहतूक व्यवस्थेत होणार महत्त्वाचे बदल

काँग्रेसमध्ये पडणार फूट; अशोक चव्हाणांसोबत 15 आमदार सामील होणार भाजपमध्ये?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version