ठाणे टेंभी नाक्यावर शिंदे गटाची दहीहंडी, मुख्यमंत्र्याची प्रमुख उपस्थिती

ठाणे टेंभी नाक्यावर शिंदे गटाची दहीहंडी, मुख्यमंत्र्याची प्रमुख उपस्थिती

ठाण्यातील टेंभी नाका येथील दहीहंडीला यावर्षी खास महत्त्व आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेली दहीहंडीचे आयोजन यावर्षी देखील करण्यात आले आहे. सकाळ पासून याठिकाणी विविध गोविंदा पथके सहभागी होत आहेत. मानाची दहीहंडी फोडण्यासाठी चढाओढ लागलेली पाहायला मिळणार आहे. मोठे स्टेज याठिकाणी उभारण्यात आले आहे.

गोविंदा पथकांसह सामान्य नागरिकांची गर्दी याठिकाणी दिसून येत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने या उत्सवाला हजेरी लावली. त्याच समोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रमुख उपस्थिती र्शवली. ठाणेकरांनी मोठ्या प्रमाणत गर्दी केली होती. त्याच प्रमाणे वरळी येथील जांभोरी मैदानात भाजपकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. इथे प्रमुख उपस्थित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दर्शवली, यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, प्रवीण दरेकर उपस्थित होते.

आला रे आला गोविंदा आला ! अखेर दोन वर्षांनी मुंबई-उपनगरांसह राज्यातभरात धाकुमाकुम

मोदींच्या नेतृत्वात आपण भ्रष्टाचाराची हंडी फोडतोय आणि श्रीकृष्णाची हंडी यासाठी फोडतोय कारण यातील विकासरुपी मलाईचा भाग सर्वांना मिळायला हवा. कालच आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे की, गोविंदाचा साहसी खेळांमध्ये समाविष्ठ झालाय. आता तुम्ही केवळ गोविंदा पथक नाही आहात, तर खेळाच्या टीम्स आहात. आता तुम्हाला खेळाडूंचा सर्व दर्जा मिळणार आहे. तुमची सर्व काळजी राज्य सरकार घेणार आहे. हे तुमचं तरुणाईचे सरकार आहे. त्यामुळे आजचा दिवस तुम्हाला समर्पित करतो आणि जन्माष्ठमीच्या शुभेच्छा देतो. असे मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडले.

हेही वाचा : 

अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘कटपुतली’चे पहिले मोशन पोस्टर रिलीज

Exit mobile version