Sunday, September 29, 2024

Latest Posts

शिंदे गटांकडून शिवसैनिकांचा खास पाहुणचार, BKC मैदानावर कोणत्या सुविधा उपलब्ध?

अखेर बहुप्रतीक्षित असलेला राज्यातील शिवसेनेचा आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा आज संध्याकाळी होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर, आता यंदाच्या दसरा मेळाव्यात उद्धव काय बोलणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. शिंदे यांच्या गटाचाही दसरा मेळावा बीकेसी येथे पार पडणार आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी शिंदे गटाकडून केली आहे. या मेळाव्याला राज्यभरातून ३ लाख लोक उपस्थित राहतील असा दावा करण्यात आलाय. यासाठी बस, ट्रेन बूक करण्यात आल्या आहेत. त्यांच्यासाठी जेवण आणि इतर सोई यांच देखील नियोजन करण्यात आलं आहे.

बीकेसीवरील शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सिनेमातील अभिनेत्याप्रमाणे एन्ट्री होणार आहे. स्टेजच्या खालून हायड्रॉलिक पद्धतीने एकनाथ शिंदे वर येणार आहे. हा स्टेज ४० बाय १२० फुटांचा असून दोन्ही बाजूला १५ बाय २० फुटांच्या दोन एलईडी स्क्रीन लावल्या आहेत. हे संपूर्ण मैदान २६०० बाय २५० फूट लांब असून इथे १ लाख २० पेक्षा जास्त खुर्च्या लागल्या आहे. त्यात व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी सेक्शन वेगळे असणार आहेत. संपूर्ण मैदानात शेवटपर्यंत १५ एलईडी स्क्रीन लावल्या आहेत.

हेही वाचा : 

WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅप युझर्ससाठी महत्वाची बातमी, सुरक्षेच्या दृष्टीने स्क्रिनशॉट काढता येणार नाही त्या ऐवजी…

तसेच शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात आमदार, खासदार, शिवसेनेचे मोठे नेते अशा १००० व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी लोकांसाठी विशेष जेवणाची सोय करण्यात आली आहे. बीकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी तीन कॅन्टीन तयार करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांसाठी विशेष कॅन्टीन तर दुसरी कॅन्टीन आमदार, खासदार आणि मोठ्या नेत्यांसाठी असेल. तर तर तिसरी कॅन्टीन राज्यभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी जे बीकेसी मैदानावर दाखल होतात त्यांच्या जेवणाची विशेष सोयीसाठी आहे.या कॅन्टीनमध्ये एक शाही कॉफी बार देखील उभारण्यात आला आहे. तेथे एका कॉफी ची किंमत हि १५० रुपये असल्याचेही सांगितले जात आहे. तसेच प्रत्येक शिवसैनिकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्थाही हि शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांच्या कडून करण्यात आली होती. तसेच हि संपूर्ण ऑर्डर ठाण्यातील प्रसिद्ध दुकान प्रशांत कॉर्नर याना दिली होती. आणि हि ऑर्डर आता अर्ध्यापेक्षा जास्त तयार देखील झाली आहे. यामध्ये ३ कचोरी, एक गुलाबजाम आणि ठेपले असे पदार्थ दिले जाणार आहेत.

Dasara Melava : नाशिक महामार्गावर महिला शिवसैनिकांडून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना दिला चोप

दसरा मेळाव्यासाठी गावावरुन मुंबईत येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी एकनाथ शिंदे गटाकडून वाशी इथल्या सिडको एक्झिबिशनमध्ये नाष्टा आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे. जवळपास ३५ हजार कार्यकर्ते दिवसभरात इथ येऊन नाष्टा, जेवण करुन मुंबईत जातील. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील कार्यकर्ते या ठिकाणी येतील.

Latest Posts

Don't Miss