Dasara Melava : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला दिल्लीतून येतोय पैसा, राष्ट्रवादी नेत्याचा गंभीर आरोप

Dasara Melava : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला दिल्लीतून येतोय पैसा, राष्ट्रवादी नेत्याचा गंभीर आरोप

सत्तासंघर्षानंतर राज्यात पहिल्यांदा शिवसेनेच्या दोन गटातील दसरा मेळावा होणार आहे. दसरा मेळाव्याला जास्तीत जास्त गर्दी व्हावी यासाठी दोन्ही गटाकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, शिंदे-ठाकरे गटाने दसरा मेळाव्यासाठी टीझर प्रसिद्ध केले आहेत. शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यात मातोश्रीबाहेर लावलेल्या एका बॅनरनं सगळ्यांचे लक्ष वेधले. दसरा मेळाव्याची परंपरा कायम राहावी यासाठी राष्ट्रवादीकडून बॅनर्स लावण्यात आले आहे. त्यावरुन, आता भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी दिल्लीतून पैसा येतोय, असे तपासे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

Dasara Melava : शरद पवारांनी शिंदे आणि ठाकरेंचे कां टोचले

आरोप करणारे करत असतात, आता आम्हीही बातमी वाचली की शिंदे गटाच्या बीकेसी मैदानातील मेळाव्याला महाराष्ट्रात ३ हजार बसेस येत आहेत. मग, या खर्चांसाठी कोण स्पॉन्सर्स करत आहे. भाजपच या गटाला पैसा पुरवत आहे, दिल्लीतून पैसा येतोय. दोन महिनेच झालेत यांना, अजून यांचा पक्ष नाही, संघटनेची नोंद नाही, अधिकृत मान्यता नाही. तरीही अशा पद्धतीने पैसा खर्च केला जातोय, तो कोठून येतो, असे म्हणत भाजपकडूनच शिंदे गटाला रसद पुरवली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

PM Gati Shakti Scheme : भारत पीएम गतिशक्तीसोबत चीनला टक्कर देणार, १०० लाख कोटींच्या या प्रकल्पा बाबत जाणून घ्या

खरी शिवसेना कोणाची?

राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले की, दसऱ्याच्या दिवशी दोन्ही गटांकडून दोन मेळावे घेण्यात येत आहेत. मात्र, खरी शिवसेना पक्षाचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालते, जी उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे. यंदा दोन दसरा मेळावा होणार आहेत, एक परंपरा, निष्ठा, स्वाभिमान आणि बाळा ठाकरेंच्या विचारांचा म्हणजेच उद्धव ठाकरेंचा मेळावा. बाळ ठाकरेंचे विचार असलेली तीच खरी शिवसेना आहे. असे महेश तपासे यांनी म्हटले.

१०८MP कॅमेरा आणि ६GB RAM सह Moto G72 झाला भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Exit mobile version