Dasara Melava : शरद पवारांनी शिंदे आणि ठाकरेंचे कां टोचले

Dasara Melava : शरद पवारांनी शिंदे आणि ठाकरेंचे कां टोचले

शिवसेनेमध्ये बंड झाल्यानंतर खरी शिवसेना कोणती यावर वाद पेटून निघाला आहे. त्यात आता दोनी गट कडून दसरा मेळावा कोणाचा चांगला होणार त्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा बी के सी येथे होणार आहे तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी मैदानात होणार आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दसरा मेळाव्यांसंदर्भात सूचक विधान केलं आहे. शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तुम्ही राज्याचे प्रमुख आहात अशी आठवण करुन देताना दसरा मेळाव्याच्या माध्यमातून कटूता वाढणार नाही अशी मांडणी असेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दसरा मेळाव्याच्या माध्यमातून दोन्ही गटांमध्ये स्पर्धा सुरु झाल्याचा उल्लेख ही पवार यांनी केला. याशिवाय नुकत्याच जाहीर झालेल्या पोटनिवडणुकांविषयीही त्यांनी भाष्य केलं आहे.

दसरा मेळाव्यावरुन ठाकरे, शिंदे दोघांनाही सुनावताना शरद पवार म्हणाले, “एका पक्षाचे दोन भाग झाले आणि ती स्पर्धा सुरू झाल्यानंतर त्या स्पर्धेचं सूत्र दसरा मेळाव्याच्या माध्यमातून चालवलं गेलं. या गोष्टी होतात, यात काही नवीन नाही. संघर्ष होतो. पण त्याला काही मर्यादा ठेवली पाहिजे आणि ती मर्यादा ओलांडून काही होत असेल तर ते राज्याच्या दृष्टीने चांगलं नाही. राज्यातले जबाबदार लोक आहे. त्यांनी हे वातावरण दुरुस्त करायला पावलं टाकायला हवीत. आणि ही पावलं टाकण्याची जबाबदारी आम्हा लोकांसारख्या सिनियर लोकांवर असेल, त्यापेक्षा राज्याच्या प्रमुखांवर अधिक आहे. यातून अपेक्षा अशी करूया की, त्यातून जी मांडणी उद्या ते मांडतील, त्यातून कटुता निर्माण होणार नाही. अशा प्रकारची मांडणी दोन्ही बाजूने झाली तर राज्यातलं वातावरण सुधारण्यास मदत होईल”.

तसेच दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर, “अपेक्षा अशी करूयात की यामधून शेवटी जी काही उद्या ते (मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरे) मांडणी मांडतील, त्यात कटूता नसेल अशाप्रकारची मांडणी दोन्ही बाजूंनी केली तर राज्यातील वातावरण सुधारायला मदत होईल,” अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली. आणि नुकत्याच पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरीतल्या जागेसाठी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा पाठिंबा ठाकरे गटालाच असेल, असंही शरद पवार यांनी सांगितलं आहे.

हे ही वाचा:

कोण आहे पंजाबी सिंगर अल्फाझ सिंह? ज्याच्यावर काल रात्री करण्यात आला हमला

PM Gati Shakti Scheme : भारत पीएम गतिशक्तीसोबत चीनला टक्कर देणार, १०० लाख कोटींच्या या प्रकल्पा बाबत जाणून घ्या

Follow Us

Exit mobile version