तारीख ठरली! ‘या’ दिवशी होणार वंचित-शिवसेना युती

जरी उद्धव ठाकरेंनी वेळोवेळी युतीचे संकेत दिले असले. तरी, वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट यांच्यातील युती नेमकी कधी होणार? असा प्रश्न सतत उपस्थित केला जात होता.

तारीख ठरली! ‘या’ दिवशी होणार वंचित-शिवसेना युती

शिवसेनेतून शिंदेगट वेगळा झाल्यापासून राज्याच्या राजकारणात रोज नवे नाट्य घडताना दिसत आहे. एकीकडे शिवसेना कुणाची याचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पोहोचला असताना. दुसरीकडे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून शिवसेना अर्थातच ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात लवकरच युती होणार आहे अशा चर्चांना उधाण आले आहे. जरी उद्धव ठाकरेंनी वेळोवेळी युतीचे संकेत दिले असले. तरी, वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट यांच्यातील युती नेमकी कधी होणार? असा प्रश्न सतत उपस्थित केला जात होता. पण आता या प्रश्नाचं उत्तर दोन्ही पक्षांकडून देण्यात आली आहेत. कारण वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातल्या युतीचा मुहूर्त अखेर ठरला आहे.

या पूर्वी प्रबोधनकार डॉट कॉम लोकार्पण सोहळ्याच्यावेळी जेव्हा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर जेव्हा एकाच मंचावर एकत्र आले होते. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात लवकरच युती होणार आहे, असे संकेत दिले होते. पण आता या युतीचा मुहूर्त ठरला आहे आणि शिवसेना (ठाकरे गट) आणि बहुजन विकास आघाडी यांच्यातील युती २३ जानेवारीला होणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने बहुजन वंचित आघाडी आणि शिवसेना (ठाकरे गट) या दोन्ही पक्षांमधील युतीची घोषणा होणार आहे. राज्यात काही महिन्यापूर्वी घडलेल्या राजकीय भूकंपामुळे शिवसेना दोन गटात विभागली गेली आणि काहींनी शिंदे गटाला आणि काहींनी ठाकरे गटाला पाठिंबा दिला. अनेक दलीत नेत्यांनी फुटीच्या वेळी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला. तसेच सुषमा अंधारे यांच्या सारख्या ज्वलंत नेत्याच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेला उत्तम फायरब्रँड नेत्या मिळाल्या.

शिवशक्ती आणि भीमशक्ती या दोन्ही संघटनांना सांभाळण्याची जबाबदारी दोन्ही संस्थांचे अध्यक्ष पँथर भाई कांबळे यांच्यावर आहे. त्यातच पँथर भाई कांबळे यांनी आणि त्यांच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यातच जर वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात युती झाली तर त्याचा फायदा शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांना महापालिका निवडणूक लढवताना होणार आहे, असे म्हंटले जात आहे.

हे ही वाचा:

जम्मूच्या नरवाल परिसर बॉम्बस्फोटाने हादरला, ३० मिनिटांच्या अंतराने झाले दोन स्फोट, ७ जण जखमी

Pathan Advance Booking बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’ ची जादू, ऍडव्हान्स बुकिंगच्या पहिल्याच दिवशी केली लाखोंची कमाई

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version