पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस : सत्ताधारी आणि विरोधकांची जोरदार बॅटिंग

राज्यात सत्तांतर झाल्यानंतरच्या पहिल्याच पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस : सत्ताधारी आणि विरोधकांची जोरदार बॅटिंग

राज्यात सत्तांतर झाल्यानंतरच्या पहिल्याच पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो गुवाहटी, चलो गुवाहटी, असे पोस्टर विरोधकांनी झळकावले. विधानभवनातील पायऱ्यांवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी शिंदे सरकारविरोधात आंदोलन करत घेरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना जशास तसं उत्तर देण्याचे आदेश दिल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दाढीवरून विधानसभेत भुजबळांची टोलेबाजी !

पावसाळी अधिवेशनाच्या सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांच्या घोषणाबाजी या होत होत्या. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ हे आक्रमक झाले आहेत. यावेळी त्यांनी काळ्या पांढऱ्या दाढीवरुन पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टोलेबाजी केली. छगन भूजबळ यांनी जीएसटीवरुन मुद्दा मांडत केंद्र सरकारवर हल्ला चढवला. यावेळी त्यांनी दाढीवरुन टोलेबाजी केली. जीएसटीच्या नावाखाली अनेक ठिकाणी लूट होत आहे. एक गोष्ट सुटलेली नाही. फक्त भाषणावर तुम्ही जीएसटी लावेला नाही. सर्व सामान्यांवर फार वाईट परिणाम होत आहे. अशी खंत भुजबळ यांनी व्यक्त केली. तसेच छगन भुजबळ पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालात याचा मला आनंद झाला. यामागचे कारण हे वेगळंच आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अस झाल आहे की दाढीवाले मुख्यमंत्री झालेत. पण त्याच्यामध्येपण सफेद दाढी आणि काळी दाढी हा फरक आहे. काळ्या दाढीचा प्रभाव हा इकडेच आहे. पांढऱ्या दाढीचा प्रभाव संपुर्ण हिंदुस्तानावर आहे. असा टोला जिएसटी वरुन छगन भुजबळ यांनी लगावला आहे.

छगन भुजबळांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काढला चिमटा !

“तुम्ही तिकडे जे मंजूर झालंय, ते इथे मंजूर करून घेत आहात. पण महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची महागाईबाबतची ही भावना तिकडे त्यांना तुम्ही सांगा. सगळ्या ठिकाणी भाववाढ सुरू आहे. शाळेतल्या पेन्सिल, खोडरबरवरही जीएसटी लावला आहे. रुग्णालयाच्या ५ हजारांवरच्या बिलावर जीएसटी लावला आहे. आपल्या उपमुख्यमंत्र्यांचा दरारा तर दिल्लीमध्ये खूपच वाढला आहे. मोठ्या कमिटीवर त्यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी जीएसटीसंदर्भातलं महाराष्ट्राचं हे म्हणणं दिल्लीत सांगितलं पाहिजे”, असं भुजबळ यावेळी म्हणाले.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पहिल्याच प्रश्नापुढे शिंदे सरकार ठरले असमर्थ

सभागृहात आरोग्याच्या सबंधित विरोधकांच्या प्रश्नावर उत्तर देताना सावंतांची चांगलीच दमछाक झाली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भात केलल्या प्रश्नांच्या भडीमाराची उत्तरे आरोग्यमंत्री आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना देता न आल्याने, शिंदे सरकारच्या कारकिर्दीतील पहिलाच प्रश्न उत्तरासाठी राखून ठेवण्याची नामुष्की शिंदे सरकारवर आली. आता या प्रश्नाचं उत्तर सरकारकडून सोमवारी दिले जाणार आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी, पालघर जिल्ह्यात हत्तीरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत यंत्रणेसाठी मंजूर अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे, भरण्यात आलेली पदे, रिक्त पदांची संख्या, हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसाठी मंजूर निधी, मागील वर्षात खर्च झालेला निधी या प्रश्नांची उत्तरे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना विचारली होती. ही माहिती आरोग्यमंत्र्यांकडे नसल्याने त्यांना उत्तर देता आले नाही आणि प्रश्न उत्तरासाठी सोमवारपर्यंत राखून ठेवण्यात आला. शिंदे सरकारला विचारलेला पहिलाच प्रश्न राखून ठेवावा लागणे, ही नामुष्कीची गोष्ट आहे.

पालघरच्या घटनेचा शासन गंभीर विचार करत आहे.- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पालघरमधील जुळ्यांच्या मृत्यूचा मुद्दा अजित पवारांनी मांडला. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघरच्या घटनेचा शासन गंभीर विचार करत आहे. असे म्हटले आहे.

रश्मी शुक्ला आणि फडणवीस यांच्या भेटीवर काँग्रेसचे टीकास्त्र

रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंगचा संदर्भ देत फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर आरोप केले होते. या सर्व प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी बुधवारी दि. १७ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भाजप नेते मोहित कंबोज हे देखील फडणवीस यांच्या निवासस्थानी भेटीसाठी आले होते. या भेटीवरुन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे. “सागर बंगल्यात वॉशिंग मशीनच काम चालतं असेल”, असा खोचक टोला थोरातांनी फडणवीसांना लगावला आहे.

मंत्रीमंडळ दुसऱ्या विस्ताराची तारीख ठरली?

१५ सप्टेंबर पर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. अशी माहिती अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिला आहे. त्यावेळी मी शपथ घेईन. अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली.

हे ही वाचा :- 

पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस, ईडी सरकार हाय हाय विरोधकांकडून घोषणाबाजी

Exit mobile version