Tuesday, July 2, 2024

Latest Posts

नाशिक मधील ‘त्या’ प्रकरणावर Devendra Fadanvis यांनी खरं कारण आणले समोर

अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये शहानिशा न करता वस्तुस्थिती न तपासता तसे पत्र व्हायरल केल्यास समाजात तेढ निर्माण होईल.कालच्या प्रकरणात सगळं स्पष्ट झालेलं आहे."अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) त्यांनी राजकीय नेत्यांचे कान टोचत त्यांच्यावर टीका केली. 

काल २२ जून रोजी नाशिकमधील काळाराम मंदिरात जाणाऱ्या लोकांना धमकी देणारं पत्र सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्या पत्रकावर विशिष्ट समाजातील लोकांना मंदिरात प्रवेशाबाबत आक्षेपार्ह विधान करुन लिहलं होतं. या धमकीपत्रावरुन राजकारणात गदारोळ सुरु होता. यासंदर्भात राज्यसरकारने दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, “काल भेटलेल्या धमकी पत्रावरुन त्या संदर्भातील पूर्णपणे माहिती पोलिसांनी शोधून काढलेली आहे. जे काळाराम मंदिराच्या आसपास राहणाऱ्या लोकांना धमकी देणारे पत्र काढण्यात आलं होतं. ते पत्र पब्लिश करणाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे.त्यात असं लक्षात आलं की, दुसऱ्या व्यक्तीशी असलेल्या वैमनस्य काढण्याकरिता त्यांनी तशा प्रकारच पत्र की ज्यामध्ये दलित समाजाला धमकी दिलेली आहे. हे पत्र काढणारा अनुसूचित जातीचाच आहे.कोणत्यातरी वेगळ्या हेतूने काढलेलं हे पत्र आहे. त्यामागे काय कारण आहे, हे शोधून काढलं आहे आणि आरोपीला अटक करण्यात आली आहे. “असं उपमुख्यमंत्री म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, “त्याच्याकडून चार मोबाईल दोन लॅपटॉप मिळाले. त्याच्या पाठीशी कोण आहे दंगल घडवण्यासाठी त्यांनी हे पत्र काढल आहे का? ज्याच्या नावाने त्यांनी पत्र काढलं, त्याच्याशी त्याचं वैर आहे.या सगळ्यामागे त्याचा काही वेगळा हेतू होता का ? बदनाम करण्यासाठी त्यांनी पत्र काढलं असावं. या प्रकरणात नाशिक पोलीस सगळ्या बाबींची चौकशी करत आहेत.मन कलुशित करून कायदा सुव्यवस्था निर्माण होणारी परिस्थिती टळली आहे.”

तर, “हे पत्र काढून पत्र सोशल मीडियावर टाकायचे आणि लोकांमध्ये गैरसमज निर्माण करून दंगल घडवण्याचे प्रयत्न यापुढेही होऊ शकतात. त्याकडे पूर्ण लक्ष आहे.डीजी आणि पोलीस विभागातील नेते यांना ही स्थिती सांगितली आहे. काही राजकीय नेत्यांनी हे पत्र ट्विट केलं. त्यांना माझी विनंती आहे की, अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये शहानिशा न करता वस्तुस्थिती न तपासता तसे पत्र व्हायरल केल्यास समाजात तेढ निर्माण होईल.कालच्या प्रकरणात सगळं स्पष्ट झालेलं आहे.”अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) त्यांनी राजकीय नेत्यांचे कान टोचत त्यांच्यावर टीका केली.

हे ही वाचा

सुदृढ नागरिक ही राज्याची संपत्ती, म्हणून…INTERNATIONAL YOGA दिनी CM Shinde यांचे आवाहन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss