CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, वर्षा बंगल्यावर व ठाण्यातील निवास्थानी सुरक्षा वाढवली

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, वर्षा बंगल्यावर व ठाण्यातील निवास्थानी सुरक्षा वाढवली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे तर आत्मघाती स्फोट घडवून शिंदेंना जीवे मारण्याचा कट रचला असल्याचेही माहिती समोर येत आहे या घटनेनंतर, मुख्यमंत्र्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात येणार आली आहे. मुख्यमंत्रांचे शासकीय व ठाण्यातील निवास्थानाबाहेर मुंबई पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महिनाभरापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचे पत्र मंत्रालयात त्यांच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर धमकीचा एक निनावी फोन देखील आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आधीच माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती.

हेही वाचा : 

बिग बॉस १६ चे चाहते साजिद खानने शोमध्ये प्रवेश केल्याने संतापले तर शहनाज गिल देखील झाली ट्रोल

त्याचबरोबर आता सरकारने पीएफआय या संघटनेवर बंदी घातली असून त्याचा या प्रकरणाचा काही संबंध आहे का याचा तपास पोलिस करत आहेत. या आधी नक्षलवाद्यांकडूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धमकी आली होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात एक निनावी पत्र आलं होतं. त्यासंबंधीही पोलिस तपास करत आहेत. आता शिंदे गटाचा दसरा मेळावा हा बीकेसीवर होणार आहे. त्या दृष्टीने आता पोलिसांनी सुरक्षेची तयारी केली असून दसरा मेळाव्याच्या स्टेजवर काही मोजकेच लोक असतील असंही समजतंय.

शिववड्याच्या चटणीला बिर्याणीचा मसाला, हाताच्या कंकणाला आरसा कशाला?, शेलारांचे शिवसेनेला रोखठोक प्रत्युत्तर

Exit mobile version