मनसे नेते अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी

मागील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत दर्गे व मशिदी विरोधात आवाज उठवला होता. त्यानंतर आता मनसे नेते अविनाश जाधव यांच्या विरोधात धर्माध शक्तींनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे

मनसे नेते अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी

मागील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत दर्गे व मशिदी विरोधात आवाज उठवला होता. त्यानंतर आता मनसे नेते अविनाश जाधव यांच्या विरोधात धर्माध शक्तींनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. धर्माधांच्या धमकीचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर ठाण्यातील महाराष्ट्र सैनिक आक्रमक झाले असून याप्रकरणी ठाणे मनसेच्या वतीने नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात राज्यभरातील अनधिकृत मस्जीद,मजार आणि दर्ग्याची उभारणीकडे सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर सरकारने तत्परतेने माहिम व सांगलीतील मजारवर तातडीने कारवाई करून उध्वस्त केले होते. तर, दुसऱ्याच दिवशी मनसे नेते अविनाश जाधव यांनी, मुंब्रा येथील डोंगरात वनखात्याच्या अखत्यारीत असलेल्या जागेवरील अनधिकृत दर्ग्याचा प्रकार उघडकीस आणून प्रशासनाला १५ दिवसात कारवाई करण्याचा अल्टीमेटम दिला होता. याचे पडसाद उमटताच जिल्हा प्रशासन व वनविभागाने मुंब्रा डोंगरावर पाहणी करून चौकशी सुरु केली असतानाच काही धर्मांध याविरोधात एकवटण्यास सुरुवात झाली. त्यातील काहींनी अविनाश जाधव यांना, ” हम उसे जिंदा नही छोडेंगे … कोई गुस्ताख छुप न पाएगा … हम उसे ढुंड ढुंड के मारेंगे … ” अशा आशयाचा व्हीडीओ सोशल मिडियात व्हायरल झाला आहे.

एस आर कमिटी … बॉयकॉट अविनाश जाधव अशा आशयाच्या या व्हीडीओतील धमकी देणारी व्यक्ती दिसत नाही. अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, या धमकीनंतर मनसे ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

 

हे ही वाचा : 

भारतीय बॉक्सर नीतू घंघासने मंगोलियाच्या खेळाडूला पराभव करून गोल्ड पदकावर नाव कोरले

मालेगावमध्ये आज उद्धव ठाकरे घेणार जाहीर सभा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version