युद्धपातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करा, शेतकऱ्यांना मदत द्या; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

युद्धपातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करा, शेतकऱ्यांना मदत द्या; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. जिल्हा प्रशासनाने अगदी कालपर्यंत युद्धपातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात मदत व पुनर्वसन तसेच कृषी विभागाला निर्देश देण्यात आले. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात परतीच्या पावसाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकामी विशेष लक्ष घालावे. पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देवून त्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.

भारत कोणाचेही ऐकणार नाही; क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर

ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्या राज ठाकरेंची राज्य सरकारला विनंती

दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याचं विनंती केली आहे. “ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचं अपरिमित नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा,” असं राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटलं आहे.

 ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी राज्य स्थिती नाही – अब्दुल सत्तार

राज्यातील शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालं आहे, त्यांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी स्थिती नाही. पण ज्या भागामध्ये नुकसान झालं आहे, त्या भागाचे पंचनामे केल्यावरच आपल्याला किती नुकसान झालं ते समजेल असेही सत्तार म्हणाले.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी स्थिती नाही, वस्तुनिष्ठ पंचनामे करावे कृषी मंत्र्यांचे आदेश

Exit mobile version