केंद्र सरकारची मोठी घोषणा; महाराष्ट्रासाठी २ लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजूर

केंद्र सरकारची मोठी घोषणा; महाराष्ट्रासाठी २ लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजूर

काही दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण तापलेलं दिसून येत आहे. महारष्ट्रामध्ये होणारा प्रकल्प पुन्हा एकदा गुजरातला घेऊन जाण्यात आला असा विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांनवर करण्यात येत आहे. त्यात आता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ हजार रोजगार देण्याचा देशव्यापी कार्यक्रम सध्या राबवण्यात येणार आहे. हाच कार्यक्रम महाराष्ट्रातही राबवण्यात येत असून त्या अंतर्गत आज पहिल्या टप्प्यातील नियुक्तीपत्र देण्यात येत आहेत. त्यानिमित्ताने पंतप्रधान मोदींनी या कार्यक्रमात संवाद साधत तरुणांना तसंच राज्य सरकारला शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्रात २ लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजूर करण्यात आले असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. मुंबईत रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून यावेळी नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. यावेळी नरेंद्र मोदींनी संवाद साधत महाराष्ट्रात भविष्यात तरुणांसाठी रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील असा विश्वास व्यक्त केला. “स्टार्टअप, लघु उद्योगांना संभाव्य आर्थिक मदत सरकार देत आहे. जेणेकरुन तरुणांना आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. सरकारच्या प्रयत्नांमधून रोजगाराच्या संधी दलित, आदिवासी, महिलांना समान स्वरुपात उपलब्ध होत आहे,” अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली.

एका वर्षात ७५ हजार रोजगार देण्याचा महासंकल्प कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई आणि प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

हे ही वाचा :

Sharad Pawar : शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दलची डॉक्टरांनी दिली मोठी अपडेट

Kartiki Ekadashi 2022 : यावर्षीची कार्तिकी एकादशी कधी साजरी होणार? घ्या संपूर्ण माहिती जाणून

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version