दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप करत केला गौप्यस्पोट, म्हणाले भाजपसोबत युती करण्यासाठी…

दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप करत केला गौप्यस्पोट, म्हणाले भाजपसोबत युती करण्यासाठी…

मुंबई : राज्यात सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु असतना, शिंदे गट व शिवसेनेकडून आरोप प्रत्यारोपाच खेळ सुरूच आहे. आज शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वर आरोप करत मोठा गौप्यस्पोट केला आहे. ते म्हणाले, ” पंतप्रधान मोदींसोबत असलेले संबंध जपण्याला उद्धव ठाकरे यांची तयारी होती, पण नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद दिल्याने उद्धव ठाकरे नाराज झाले आणि त्यानंतर हे संबंध बिघडले”, असा गौप्यस्फोट दिपक केसरकरांनी केला आहे.

पुढे केसरकर म्हणाले, “कालांतराने आदित्य ठाकरेंची बदनामी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग करण्याचे ठरवले एकनाथ शिंदे आणि इतर आमदार कुटुंबप्रमुख उद्धव ठाकरेंना भाजपसोबत युती करण्यासाठी तयार करण्याचे प्रयत्न सुरु होते या संदर्भात भाजप आणि शिवसेनेत बोलणी सुरु असताना भाजपच्या 12 आमदाराचं निलंबन झाले,यामुळे भाजप आणि शिवसेनेतील संबंध बिघडले. असे त्यांनी सांगितले.

केसरकर यांनी पुढे म्हटले, “एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवून भाजपसोबत युती करण्याला उद्धव ठाकरेंची तयार होती, पण भाजपला हे मान्य नव्हते. याशिवाय शिवसेना आमदारांनाही हे मान्य नव्हते. त्यानंतर महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप आला हे आपल्याला सर्वांचा माहित आहे, असेही केसरकर म्हणाले.

शिवसेना कायम राहिली पाहिजे असे आमचे मत आहे. मात्र कार्यकर्त्यांच्या भावना भडकावणे योग्य नाही. एकनाथ शिंदे दोन नंबरचे नेते, अशा नेत्याला बाजूला डावलून पक्ष चालवणे योग्य नाही. एकनाथ शिंदे सातत्यानं बोलत होते, भाजपसोबत जाऊ पण ते कधीच झाले नाही. म्हणून शिंदे गटानी निर्णय घेत अखेर बाहेर पडला, असे स्पष्टीकरण केसरकरांनी दिले.

हेही वाचा : 

मंत्रिमंडळाचा विस्तार करायला कशाला घाबरत आहात?, अजित पवारांचा राज्य सरकारला सवाल

Exit mobile version