दीपक केसरकर साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला अजूनही आदर

दीपक केसरकर साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला अजूनही आदर

शिवसेनेतून बंड करून शिंदे गटात सामील झालेले आणि आताचे महाराष्ट्र राज्याचे मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शिर्डीत जाऊन साईबाबाचं (Sai Baba) दर्शन घेतलं आहे. राज्याचं हिवाळी अधिवेशन (Winter session) उद्यापासून सुरू होत आहे. शिंदे सरकारचं हे पहिलंच हिवाळी अधिवेशन आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री दीपक केसरकर हे शिर्डीत (Shirdi) आले आहेत. शिर्डीत आल्यावर त्यांनी साई बाबांचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हातून महाराष्ट्राचं कल्याण होऊ दे, असं साकडं केसरकर यांनी साईबाबांना घातलं. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आदरही व्यक्त केला.

उद्यापासून नागपूरला विधामंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. अधिवेशनापूर्वी मंत्री दीपक केसरकर यांनी शिर्डीत साईबाबचे दर्शन घेतलं. यावेळी केसरकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महाराष्ट्राचं कल्याण होऊ दे, अशी साईचरणी प्रार्थना केली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) टीका केली.

उद्धव साहेबांबद्दल मला आदर आहे. ते आता रस्त्यावर उतरले हे चांगलेच आहे. मात्र, ज्यावेळी लोकांसाठी रस्त्यावर उतरण्याची संधी होती तेव्हा उतरायला हवं होतं, असे म्हणत दीपक केसरकारांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. जोपर्यंत सरकार अस्तित्वात होतं तोपर्यंत चेहऱ्यावर मास्क होता. सरकार गेलं मास्क उतरला असं केल्याने जनतेत चुकीचा मेसेज जातो असे केसरकर म्हणाले. आमच्यासारख्या आमदाराला सुद्धा उद्धव ठाकरेंची भेट मिळत नव्हती असे केसरकर म्हणाले. राज्य सक्षमपणे चालवावं लागतं, केंद्राकडे बोट दाखवून चालत नाही. आमचं सरकार नवीन टेक्नॉलॉजी महाराष्ट्रात आणत असल्याचे दीपक केसरकर म्हणाले. समृद्धी महामार्गसारखा (Samruddhi Mahamarg) रस्ता कोकणात जाण्यासाठी होणार असल्याचे केसरकर म्हणाले.

 ही वाचा : 

मुख्यमंत्री शिंदेची खुर्ची जाणार का ?, चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं सुचक वक्तव्य

क्लीन चिटनंतर किरीट सोमय्यांचा पुन्हा संजय राऊतांवर हल्लाबोल

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version