तुम्ही अजून लहान आहात, आमचा अपमान केला तर…; दीपक केसरकर आदित्य ठाकरेंवर संतापले

तुम्ही अजून लहान आहात, आमचा अपमान केला तर…; दीपक केसरकर आदित्य ठाकरेंवर संतापले

दीपक केसरकर आदित्य ठाकरेंवर संतापले

मुंबई : शिवसेना नेते आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर जोरदार टीकाबाजी करत आहेत. बंडखोर आमदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावे असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना केले. आदित्य ठाकरे यांना प्रतिउत्तर देण्यासाठी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांच्यासोबत दादा भोसे संजय राठोड देखील उपस्थित होते.

शिवसैनिक दूर केले म्हणून यात्रा सुरू केल्या या आधी अशा गाठीभेटी कधी घेतल्या नाहीत. वेगवेगळ्या यात्रा काढल्या नाहीत. असे म्हणत दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. पुढे म्हणाले, आदित्य ठाकरे तरुण आहेत कसे वागावे बोलावे यासाठी उद्धव ठाकरे यांचा आदर्श त्यांनी बाळगावा. आदित्य ठाकरे निम्मे वयाचे आहेत मात्र ते आले की आम्ही खुर्चीवरून उठायचं कारण त्यांचे आजोबांना आम्ही मान देतो. असेही केसरकर यावेळी म्हणाले.

केसरकर पुढे म्हणाले, “आम्हा शिवसेनेकांच्या पक्ष निष्ठेवर शंका घेणे आमच्या मनाला लागले आहे. तुम्ही किती यात्रा काढा पण लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही बोलणार असा इशारा केसरकरांनी आदित्य ठाकरेंना दिला.

हेही वाचा : 

मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Exit mobile version